अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi)तिच्या फिटनेसबाबत अतिशय जागरूक आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या यादीत मंदिराचे नाव आवर्जून घेतले जाते. सोशल मिडियावरही मंदिरा खूपच जास्त ॲक्टीव्ह असते. मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी या काही अभिनेत्री आठवड्याच्या सुरुवातीला त्यांचं एक फिटनेस मोटीव्हेशन सोशल मिडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. मंदिराचा देखील असाच प्रयत्न असतो. या आठवड्यात मात्र मंदिराने कमालच केली आहे. तिने शेअर केलेला एक व्हिडियो तर तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच मोटीव्हेशन (fitness motivation) ठरणारा आहे, पण त्यासोबतच या व्हिडियोतून मंदिरा किती कमालीची फिट आहे, हे देखील दिसून येते.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडियोमध्ये मंदिराने हॅण्डस्टॅण्ड नावाने ओळखले जाणारे एक वर्कआऊट (workout) केले आहे. हा वर्कआऊटचा असा प्रकार आहे, ज्यामध्ये आपल्या शरीराचा संपूर्ण भार केवळ आपल्या हातावर पेलायचा असतो. अतिशय अवघड मानला जाणारा हा व्यायाम मंदिराने अतिशय सहजतेने केला आहे. हा अवघड व्यायाम करताना ती खूप ओढून ताणून किंवा खूप मेहनत घेऊन हे सगळं करते आहे, असं मुळीच वाटत नाही. हीच तर तिच्या फिटनेसची खरी मजा आहे. हा व्हिडियो पाहून मंदिराचे चाहते खरोखरंच थक्क झाले आहेत. एकसलग तब्बल ३३ वेळा हॅण्डस्टॅण्ड करणारी मंदिरा ५० वर्षांची आहे, हे तर तो व्हिडियो पाहताना मुळीच वाटत नाही. व्हिडियो शेअर करताना मंदिराने सगळ्यांना wishing a strong, #brave morning to all of you.... असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. असं तिने का म्हटलं असावं, याचा अंदाज तिचा व्हिडियो पाहिल्यानंतरच येतो.
कसं करताना हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊट?
हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊट हा प्रकार थोडा फार शिर्षासनाशी मिळताजुळता आहे. या दोघांमधला सगळ्यात मुख्य फरक म्हणजे शिर्षासन करताना सगळ्या शरीराचा भार डोक्यावर पेलला जातो. तर हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊट करताना सगळ्या शरीराचा भार दोन्ही हातांच्या पंजावर झेलावा लागतो. हा व्यायाम करण्यासाठी भिंतीचा आधार घ्यावा. त्यानंतर हाताचे दोन्ही पंजे जमिनीवर ठेवावेत. हळूहळू पाय हाताकडे पुढे- पुढे सरकवत एकदम वर उचलावेत, सरळ करावेत आणि सगळे शरीर हाताच्या पंजावर तोलून धरावे. हा व्यायाम मुळीचा साधा- सोपा नाही. तुमचा फिटनेस उत्तम असेल, तर सुरूवातीला ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच हा व्यायाम करावा.
हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊट करण्याचे फायदे
Benefits of handstand workout
- या वर्कआऊटमुळे हात, खांदे, पाठ आणि कंबर यांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.
- रक्ताभिसरण अधिक उत्तम होण्यासाठी हा व्यायाम चांगला आहे.
- हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊट केल्यामुळे एकाग्रता वाढते.
- हा व्यायाम केल्यामुळे मेंदूला खूप चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो. त्यामुळे एनर्जी मिळविण्यासाठी, सकारात्मक विचार करण्यासाठी आणि मन आनंदित, प्रफुल्लित होण्यासाठी हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊट करावे.
- हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊटमुळे श्वसनसंस्था मजबूत होते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.