Lokmat Sakhi >Fitness > वय २५ पण या ६ गोष्टी जमत नाहीत? जगण्याच्या परीक्षेत तुम्ही नापास व्हाल..

वय २५ पण या ६ गोष्टी जमत नाहीत? जगण्याच्या परीक्षेत तुम्ही नापास व्हाल..

Try This 6 Things Before You Get 25 : ६ गोष्टी जमायला हव्यात; वय वाढलं तरी राहाल तरुण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 10:53 AM2023-07-13T10:53:01+5:302023-07-13T10:55:56+5:30

Try This 6 Things Before You Get 25 : ६ गोष्टी जमायला हव्यात; वय वाढलं तरी राहाल तरुण...

Try This 6 Things Before You Get 25 : Age 25 but don't fit these 6 things? You will fail the test of survival.. | वय २५ पण या ६ गोष्टी जमत नाहीत? जगण्याच्या परीक्षेत तुम्ही नापास व्हाल..

वय २५ पण या ६ गोष्टी जमत नाहीत? जगण्याच्या परीक्षेत तुम्ही नापास व्हाल..

पुढच्या महिन्याच्या १ तारखेला व्यायामाला सुरुवात करु आणि पुढच्या आठवड्यापासून मी बाहेरचे खाणे पूर्ण बंद करणार आहे. अशा स्वरुपाची वाक्य आपण नेहमी ऐकतो. काही वेळा आपणही असे संकल्प करतो. मात्र काही ना काही कारणांनी हे संकल्प कधीच पूर्ण होत नाहीत. आठवडे, महिने, वर्ष जात राहतात आणि आपले वयही वाढत राहते, मात्र आपण ठरवलेल्या गोष्टी मात्र मागे पडच जातात. वयाच्या २५ वर्षापर्यंत आपण शिक्षण संपवून नोकरीला लागलेले असतो. प्रोफेशनल जगात प्रवेश करत असताना आपण काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. साधारण या वयापर्यंत आपल्या ठराविक गोष्टी सेट झालेल्या असायला हव्यात. या गोष्टी कोणत्या आणि त्याकडे कशापद्धतीने लक्ष द्यायला हवे याविषयी समजून घेऊया (Try This 6 Things Before You Get 25)...

१. सकाळी लवकर उठणे

लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्य समृद्धी लाभे हे वचन आपण अनेकदा ऐकतो. पहाटे लवकर उठलो तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सूर्योदय होण्याच्या आधी पोट साफ झालेले असेल तर आरोग्य उत्तम राहते. म्हणूनच पहाटे ५ वाजता उठायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

२. काम करताना 

आपल्यापैकी बहुतांश जण दिवसाचे ८ ते ९ तास नोकरी करतात. त्यातील किमान ५ तास आपण मन लावून, झओकून देऊन काम करायला हवे. म्हणजे आपल्या क्षेत्रात आपण पुढे जाण्याची निश्चितच शक्यता असते. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा बॅलन्स राखता यायला हवा.  

३. स्वयंपाक करा

स्वत:साठी स्वत: अन्न बनवणे ही सर्वात महत्त्वाची आणि अतिशय चांगली गोष्ट आहे. लहानपणापासून आपल्याला आई, आजी असे कोणी ना कोणी बनवून खाऊ घालत असते. मात्र वयाच्या एका टप्प्यानंतर आपल्याला आपले अन्न तयार करता यायला हवे. यासाठी स्वयंपाकाबाबतच्या किमान गोष्टींची माहिती करुन घेणे गरजेचे आहे. 

४. आयुष्य खासगी ठेवा

तुमचे आयुष्य आतापर्यंत आई वडील किंवा मोठे बहीण भाऊ यांच्यावर अवलंबून असते. तसेच मित्रमंडळी, नातेवाईक यांचाही आपल्या आयुष्यात महत्त्वाचा रोल असतो.  हे आय़ुष्य वयाच्या पंचवीशीनंतर थोड्या प्रमाणात का होईना खासगी असायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

५. व्यायाम महत्त्वाचाच

व्यायाम हा प्रत्येक वयात अतिशय महत्त्वाचा असून तरुण वयात तर आवर्जून व्यायाम करायला हवा. किमान १ तास तरी योगा, जीम, अॅरोबिक्स, सायकलिंग, चालणे, पोहणे यांसारखा शरीराची ताकद वाढवणारा व्यायाम करायला हवा. 

६. व्यक्तिमत्त्वावर काम करायला हवे

वयाच्या २५ वर्षापर्यंत आपले व्यक्तिमत्त्व पूर्णपणे तयार झालेले असायला हवे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करायला हव्यात. त्यासाठी मानसिक स्वास्थ्य, आपल्यातील गुण-दोष यांच्यावर योग्य पद्धतीने काम करायला हवे. 

Web Title: Try This 6 Things Before You Get 25 : Age 25 but don't fit these 6 things? You will fail the test of survival..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.