समीरा रेड्डी ही बॉलीवूडची अशी अभिनेत्री आहे जिचे विचार खूपच वास्तववादी आहेत.. म्हणूनच ती जे काही तिच्या चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, ते सर्वसामान्यांशी लगेचच खूप कनेक्ट होणारं असतं... त्यामुळेच तर तिचा फिटनेस किंवा हेल्थ सल्ला सिरिअसली घेणारे अनेक जण आहेत... समीरा इन्स्टाग्रामवर (instagram) बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असते. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ (viral video of Sameera reddy) इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सध्या तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
तुम्ही जसे आहात, तसे स्वत:ला स्विकारा आणि स्वत:वर प्रेम करा.. हा समीराच्या आयुष्याचा फंडा. ती तिच्या चाहत्यांनाही नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता हेच बघा ना मध्यंतरीच्या काळात तिने तिचे पांढरे केस स्विकारले आणि त्याचाही फोटो सोशल मिडियावर शेअर करायला मागे- पुढे पाहिले नाही.. अर्थात असं करायला हिंमत लागते. ती तिच्याकडे आहे.. तसंच तिच्या वाढलेल्या वजनाचंही.. आपल्याला माहितीच आहे की पहिल्या बाळांतपणानंतर वाढलेले वजन समीराने खूप प्रयत्नांनी कमी केले असून आता पुन्हा ती स्लिम- ट्रीम झाली आहे. पण वजन वाढले, हे तिने स्विकारलं आणि त्याबाबत कधीच कमीपणा बाळगला नाही..
याच आशयाचा तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये समीरा वर्कआऊट करताना दिसते आहे. या व्हिडिओसाठी तिने जी कॅप्शन लिहीली आहे, ती खरोखरंच खूप महत्त्वाची आणि वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाने वाचावीच अशी आहे. आपल्यापेक्षा दुसऱ्यांचं कसं आणि किती चांगलं आहे, हे बघायचं आणि स्वत:कडे दुर्लक्ष करायचं ही सवय प्रत्येकाचीच असते.. हीच गोष्ट फिटनेस, वर्कआऊट याविषयीही लागू होते.
त्यामुळे बऱ्याच मैत्रिणी आपण किती आणि कसं वर्कआऊट करतो आहोत, यापेक्षा दुसरी मैत्रीण काय करते आहे, ती आपल्यापेक्षा किती स्लिम आणि फिट आहे, हे बघण्यात जास्त वेळ घालवतात. कायम दुसऱ्यांसोबत स्वत:ची तुलना करतात. पण व्यायाम करताना हे सगळं सोडून द्या, असं समीरा सांगते. ती म्हणते की तुमची तुलना कधीच दुसऱ्या कुणाशी करू नका. तुम्ही मागच्या पेक्षा यावेळी अधिक चांगलं केलं, तर ती तुम्ही तुमच्यात केलेली सुधारणा आहे, हे लक्षात घ्या. तुमचा- तुमचा स्वत:चा वेगळा मार्ग लक्षात घ्या आणि तो चालत रहा.. स्वत:ची तुलना स्वत:शीच करा, असं ती ठासून सांगते आहे. दुसरे माझ्यापेक्षा किती चांगलं करत आहेत, याच्याशी माझं काहीच देणं घेणं नाही कारण मला मी जे केलं आहे, त्यापेक्षा अधिक चांगलं करायचं आहे आणि ते मी करते आहे,.. असं ती या व्हिडिओतून सांगते आहे.