काही वर्षांपूवीची सारा अली खान आणि आताची लोकप्रिय अभिनेत्री सारा या दोघी एकच की वेगवेगळ्या? असा प्रश्न पडावा इतका बदल सारा अली खाननं स्वत:मधे केला. तिने हा बदल प्रयत्नपूर्वक आणि जिद्दीनं केला. पण तिच्यामधे ही जिद्द निर्माण झाली ती तिच्या आईमुळे. सारा म्हणते, जर तेव्हा आईनं मला आरसा दाखवला नसता तर मी कधीच बदलले नसते.
एका मुलाखतीत सारा अली खाननं आपलं जीवन अमूलाग्र बदलून टाकणारा अनुभव चाहत्यांना सांगितला. आपण कितीही श्रीमंत घरात जन्माला आलो असलो तरी आपल्या स्वत:त जेव्हा बदल करायचा असतो तेव्हा पैसा नही तर स्वत:ची इच्छाशक्ती आणि त्यामागची प्रेरणा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सारा म्हणते, तिच्यातली स्वत:त बदल करण्याची इच्छाशक्ती जागवली ती तिच्या आईनं. अमृता सिंगनं.
Image: Google
सारा म्हणते माझ्या वाढत जाणार्या वजनाकडे बघून आईनं मला एकदा पूर्वीच्या काळातल्या एका प्रसिध्द अभिनेत्रीचं उदाहरण देत सांगितलं, 'सारा अगं आता ‘टूनटून’ असण्याचा, टूनटून म्हणून मिरवण्याचा, टूनटून होऊन लोकप्रिय होण्याचा काळ केव्हाच मागे पडला. जर तुला खरंच अभिनेत्री व्हायचं असेल तर नुसतं मनात असून चालणार नाही. लोकांनी तुला अभिनेत्री म्हणून स्वीकारण्यासाठी काय करायला हवं, हे तुला चांगलंच माहीत आहे!' हे सांगतांन तिला माझ्या जाडेपणाविषयीची लाज वाटत होती असं नाही. पण एक अभिनेत्री होण्यासाठी काय हवं हे तिनं आईच्या भूमिकेतून आणि तिच्यातल्या अभिनेत्रीच्या अनुभवातून मला सांगितलं. त्आईचे ते शब्द म्हणजे माझ्यासाठी आरसा होते. मला अभिनेत्री तर व्हायचं होतं, पण त्यासाठी मी खरंच काय करत होते? माझा मलाच प्रश्न पडला. मी भानावर आले. तेव्हापासून ठेवलेलं फिटनेसचं ध्येय आज यशस्वी अभिनेत्री झाल्यानंतरही सारा अली खाननं बाजूला ठेवलं नाही.
Image: Google
साराची फॅट टू फिट जर्नी
फॅट टू फिट असं ठसठशीत ट्रान्सफोर्मेशन साराच्या बाबतीत तिने स्वत: आणि तिला पाहाणार्यांनीही अनुभवलं आहे. 96 किलो वजनावरुन सारानं आपलं वजन 54 किलोवर आणलं. त्यासाठी सारानं आपली अनारोग्यकारक जीवनशैली आधी बदलली. पिझ्झा खाणारी सारा सलाड खाऊ लागली. आळस सोडून जिममधे वर्कआउट करु लागली. पळणं, चालणं, पोहोणं, सायकलिंग आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग करत सारा घाम गाळू लागली.
Image: Google
वजन कमी करण्यासाठी आपल्या आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारतले साखर, बटाटा आणि पांढरा तांदूळ कमी केला. साखरेऐवजी मध आणि गूळ तर पांढर्या तांदळाच्या जागी ब्राउन राइसचा समावेश केला. आहारतज्ज्ञांनी सांगितलेले डाएटचे नियम तिने कटाक्षानं पाळू लागली. वजन कमी झालं तरी सारा वर्कआउट आणि डाएटचे नियम आजही पाळते.सारानं वजन घटवताना ऐकीव आणि कोणाच्या सांगण्यावर अवलंबून राहून उपाय केले नाहीत. डॉक्टर, जिम ट्रेनर आणि आहारतज्ज्ञ यांचा सल्ला घेत स्वत:च्या जीवनशैलीत बदल केला. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने आहार आणि आरोग्यकारक सवयींद्वारे पचनक्रिया सुधारली. त्यासाठी आपल्याला डिटॉक्स वॉटरचा खूप उपयोग झाला असं सारा सांगते.
साराला पीसीओडी आहे तरीही...
सारा अली खानच्या जास्त वजनामागचं कारण पीसीओडी देखील होतं. पॉलिसिस्टिक ओवरी डिसऑर्डर किंवा पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम अर्थात पीसीओडी. या समस्येत अंडाशयावर गाठ येते. यामुळे मासिक पाळी अनियमित होते. पीसीओडीच्या समस्येत महिलांच्या शरीरात अँंड्रोजन या पुरुषी संप्रेरकाची पातळी वाढते. यामुळेच मासिक पाळीत अडथळे आणि अंडाशयात समस्या निर्माण होतात. साराला पीसीओडीची समस्या असल्यामुळेही तिचं वजन जास्त होतं. पण पीसीओडी ही समस्या योग्य जीवनशैली, आहार आणि व्यायाम याद्वारे नियंत्रित करता येते. सारा अली खाननं नेमकं हेच केलं.
Image: Google
सारा स्पेशल वेटलॉस टिप्स
1. नृत्य शिका, नृत्य करा. सारा म्हणते नृत्य करताना संपूर्ण शरीराची हालचाल होते, शरीराचा व्यायाम नृत्यातून चांगला होतो. वजन कमी करण्यासाठी आपण केवळ व्यायामावर अवलंबून राहिलो नाही तर वजन कमी करण्यासाठी डान्स थेरपीचा आधार घेतल्याचं सारा सांगते. कथ्थक नृत्य शिकून त्याचा सराव रोज करत असल्यानं साराच्या शरीराला सुडौलता प्राप्त झाली.2. व्यायामासोबत खेळही आहे महत्त्वाचा. सारा आपल्या रोजच्या वर्कआउटसोबतच वडील सैफ अली खानसोबत दिड ते दोन तास टेनिस खेळायची, तर भावाशी रग्बी खेळायची.3. सारा म्हणते 96 किलो वजनावरुन 54 वर येणं ही मजा नाही आणि मॅजिकही. त्यासाठी फिटनेस ट्रेनरच्या सल्ल्यानुसार वर्कआउट करणं गरजेचं होतं , तेच मी केलं.4. वर्कआउट, खेळ, नृत्य यासोबतच योग्य, पौष्टिक आणि संतुलित आहाराने सारानं आपलं वजन घटवलं.वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नाश्त्याला फळं खाणं ( फायबर, जीवनसत्त्वं, खनिजं शरीराला मिळण्यासाठी), डाएटमधे प्रथिनांचं प्रमाण वाढवणं, पचन सुलभ करुन वजन कमी करण्यास मदत करणार्या फायबर घटकाच्या पदार्थांचा समावेश केला. तसेच वजन कमी करण्यासाठी शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडणं गरजेचं असतं. यासाठी सारा जिरे पाणी, ग्रीन स्मूदी असे डिटॉक्स वॉटर आणि पेय पिण्यचा सल्ला देते. सारा स्वत: रोज न चुकता घरच्या घरी डिटॉक्स वॉटर आणि डिटॉक्स ड्रिंक तयार करते आणि न चुकता पिते.