आजकाल प्रत्येकजण मेंटेन दिसण्याच्या प्रयत्नात असतो. (Drink For Belly Fat Loss) पण व्यायाम आणि डाएट करणं सर्वांनाच जमतं असं नाही. अनेकजण व्यायाम करायला खूप कंटाळा करतात. अशावेळी रोजच्या रूटीनमध्ये काही बदल करून तुम्ही वजन कमी करू शकता. जसं रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्या, हेल्दी पदार्थांचा ब्रेकफास्टमध्ये समावेश करा. मसाल्याच्या डब्यातील बरेच पदार्थ वजन कमी करण्यास मदत करू शकतात. (Weight Loss Tips)
हळदीला गोल्डन स्पाईस असं म्हटलं जातं. हळदीतील पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. भारतीय स्वंयपाकघरात हळद हा महत्वाचा पदार्थ आहे. चवीबरोबर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. थंडीच्या वातावरणात हळदीचे सेवन केल्याने बरेच फायदे मिळतात. हळद गरम असते हळदीचे दूध झोपण्याआधी प्यायल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. (Turmeric Water For Weight Loss)
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार हळदीतील करक्यूमिन वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. हळदीचे पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला यांसारख्या समस्या टाळता येतात. हळदीचे पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. याशिवाय वजन कमी होण्यासही मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन कसे करायचे ते पाहूया.
थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा
हळदीचे पाणी तयार करण्यासाठी सगल्यात आधी १ ग्लास पाणी उकळून घ्या. त्यात कच्ची हळद घालून पाणी उकळत ठेवा जेव्हा पाणी अर्ध होईल तेव्हा गाळून या पाण्याचे सेवन करा. जर तुमच्याकडे कच्ची हळद नसेल तर तुम्ही अर्धा चमचा हळद पावडर घेऊ शकता. जेव्हा पाणीअर्ध होईल तेव्हा गाळून या पाण्याचे सेवन करा. याची चव तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यात मध मिसळून पिऊ शकता. वजन कमी करण्यासाठी हा सोपा उपाय आहे.
हळदीचे पाणी पिण्याचे फायदे (Turmeric Water For Weight Loss)
हळदीत व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, आयर्न, जिंक यांसह अनेक पोषक तत्व असतात. यातील एंटी बॅक्टेरिअल, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी सेप्टीक गुण शरीराला डिटॉक्स करतात. ज्यामुळे अनेक शारीरिक समस्यांपासून बचाव होण्यास मदत होतो. हळदीचे पाणी प्यायल्याने इम्यूनिटी मजबूत होते. इतकंच नाही तर त्वचेसंबंधी समस्याही दूर होतात.