Lokmat Sakhi >Fitness > फुग्यासारख्या गोलगुबगुबीत झालाय चेहरा? स्वयंपाकघरातले ५ पदार्थ करतील जादू-चेहऱ्यावरची चरबी कमी होईल चटकन

फुग्यासारख्या गोलगुबगुबीत झालाय चेहरा? स्वयंपाकघरातले ५ पदार्थ करतील जादू-चेहऱ्यावरची चरबी कमी होईल चटकन

Ultimate Guide to Lose Face Fat With 5 Home Remedies : व्यायाम न करता, फक्त ५ पैकी १ पदार्थ खाऊन चेहऱ्यावरची चरबी कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 02:35 PM2024-10-17T14:35:37+5:302024-10-17T19:45:17+5:30

Ultimate Guide to Lose Face Fat With 5 Home Remedies : व्यायाम न करता, फक्त ५ पैकी १ पदार्थ खाऊन चेहऱ्यावरची चरबी कमी होईल

Ultimate Guide to Lose Face Fat With 5 Home Remedies | फुग्यासारख्या गोलगुबगुबीत झालाय चेहरा? स्वयंपाकघरातले ५ पदार्थ करतील जादू-चेहऱ्यावरची चरबी कमी होईल चटकन

फुग्यासारख्या गोलगुबगुबीत झालाय चेहरा? स्वयंपाकघरातले ५ पदार्थ करतील जादू-चेहऱ्यावरची चरबी कमी होईल चटकन

अनेकदा वजन वाढलं की त्याचा सर्वात आधी परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो (Weight Loss). चेहऱ्यावर फॅट्स (Face Fat) जमा होतो. गुबगुबीत चेहरा असला की, आपण फोटो काढण्यासही टाळतो (Fitness). वाढलेलं वजन (Weight Gain) कमी करण्यासाठी आपण व्यायाम (Exercise) आणि आहारातही (Diet) बदल करतो. ज्यामुळे शरीर सुडौल आणि चेहऱ्यावरची चरबीही कमी होते.

जर शरीर सुडौल (Fit Body) झाले असेल आणि चेहऱ्यावरची चरबी कमी होत नसेल तर, आहारात काही पदार्थांचा समावेश करून पाहा. या पदार्थांमुळे शरीराच्या वजनासोबतच चेहऱ्यावरील चरबीही झपाट्याने कमी होईल. शिवाय चेहरा शेपमध्ये दिसेल. आहारात नक्की कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? याची माहिती आहारतज्ज्ञ शिवाली गुप्ता यांनी दिली आहे(Ultimate Guide to Lose Face Fat With 5 Home Remedies).

गुबगुबीत चेहरा शेपमध्ये करण्यासाठी फॉलो करा काही टिप्स

हिरव्या पालेभाज्या

चेहऱ्यावरील गुबगुबीत कमी करण्यासाठी आपण आहारात पालेभाज्यांचा समावेश करू शकता. पालक, मुळ्याची पाने, मेथी इत्यादी हिरव्या पालेभाज्या आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवा. या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. यासोबतच यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करतात.

दिवाळी : फराळाचे पदार्थ तळण्यासाठी कोणते तेल योग्य? तज्ज्ञ सांगतात, ‘हे’ तेल योग्य- वाढत नाही वजन

ड्रायफ्रुट्स

बदाम, काजू आणि अक्रोड हे गुड फॅट्सचं उत्तम स्त्रोत आहे. यामुळे भूक नियंत्रित राहते. ड्रायफ्रुट्समध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कॅलरीज वाढत नाही. याव्यतिरिक्त ड्रायफ्रुट्समध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करतात.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या

शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि विषारी घटक काढून टाकण्यासाठी पुरेसे पाणी प्या. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात सूज वाढते. अशावेळी आपण जास्त प्रमाणात पाणी प्याल तर, शरीरातून नक्कीच फॅट्स बाहेर पडतील. यासोबतच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. यामुळे चेहरा आणि शरीराची चरबी कमी होईल.

धान्य

आपल्या आहारात विविध प्रकारच्या धान्यांचा समावेश करा. गहू, बार्ली, बाजरी आणि ज्वारीचे पदार्थ खा. या धान्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. शिवाय फायबरचेही प्रमाण जास्त असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. यासह वेट लॉससाठी मदत होते.

आईबाबांनी फक्त ४ गोष्टी केल्या तर मुलं आयुष्यात डगमगणार नाहीत-खचणार नाहीत, जन्मभराची काळजी संपेल

फळे खा

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी फळांचा आहारात समावेश करा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपल्याला अधिक वेळ भूक लागत नाही. आपण हंगामी फळे खाऊ शकतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदा होईल.

Web Title: Ultimate Guide to Lose Face Fat With 5 Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.