गोड पदार्थांना फिटनेसचा शत्रू समजलं जातं. कारण गोड पदार्थ हे लठ्ठपणा वाढवतात आणि बारीक होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. शरीरात साखर जास्त प्रमाणात जमा झाल्यास त्याचे फॅट्समध्ये रूपांतर होते. कालांतराने कंबरेची चरबीसुद्दा वाढू लागते. (Unique Health Benefits of Honey) शरीराला साखरेची गरज नसते असं अजिबात नाही. (How to loss weight) शरीरात योग्य प्रमाणात साखर असल्यास कमकुवतपणा, चक्कर येणं यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. पण पांढरी साखर खाण्यापेक्षा नैसर्गिक साखर खाणं केव्हाही उत्तम. यामुळे वजन आणि शुगर सहज कंट्रोलमध्ये राहते. (Weight Loss Tips)
वजन कमी करण्यासाठी मधाचे सेवन करा (Benefits of Honey Advantages & Uses of Honey)
1) वजन कमी करण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकता. रोजच्या आहारात इतर गोड पदार्थांऐवजी मधाचा समावेश करा. कारण यामुळे फक्त लठ्ठपणाचं कमी होत नाही तर त्वचासुद्धा सुंदर बनते. मधामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, त्यात व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, अमीनो ऍसिड, कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन आणि नियासिन भरपूर प्रमाणात असते. कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण खूप कमी असते. याची चव गोड असली तरी वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
तब्येत लुकडीसुकडी पण पोट प्रचंड सुटलं? ५ पदार्थ खा, लवकरच वजनात दिसेल घट
2) नॅशलन सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार जर तुम्ही नियमित मधाचे सेवन केले तर शरीराला भरभरून उर्जा मिळते. हे एक प्रकारे फॅट बर्नरप्रमाणे काम करते. यामुळे हळूहळू वजन कमी होऊ लागते. याशिवाय मेटाबॉलिझ्म वाढतो आणि चरबी सहज वितळते.
3) जर तुम्हाला वेगानं वजन कमी करायचं असेल तर सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्या चांगल्या इफेक्ट्ससाठी तुम्ही यात लिंबाचा रस घालू शकता काही लोक ग्रीन टी मध्येही मध मिसळून पिणं पसंत करतात.
तेल लावल्यानंतर केस खूप गळतात? तेल लावताना ३ टिप्स लक्षात ठेवा; दाट-लांब होतील केस
4) मध खाल्ल्यानं झोपेची गुणवत्ताही सुधारते. शरीरात मेलानिल प्रोडक्शन व्यवस्थित होते. ज्यामुळे चांगली झोप येते. पोटात होणारा त्रास दूर करण्यासाठी मधाचे सेवन करायला हवे. आतड्यातील बॅक्टेरियांनाही पोषण मिळते. याशिवाय मेंदूचे आरोग्यही सुधारते. मध मेंदूचे आरोग्य सुधारण्यासही उत्तम ठरते.