Join us  

वाढलेलं युरीक ॲसिड कंट्रोलमध्ये ठेवतात ५ सवयी; त्रास वाढण्यापूर्वी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 5:18 PM

Uric Acid Control Food : अनुवांशिकता, चुकीचा आहार, सीफूड, राजमा, पनीर आणि भात जास्त खाल्ल्याने देखील ते वाढू शकते.

सध्याची व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्यातील चुकीच्या पदार्थांमुळे कमी वयातच गंभीर आजारांचा धोका उद्भवत आहे. युरीक ॲसिड शरीरात वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. (How to reduce uric acid, Uric acid causes treatment diet reduce uric acid level naturally) सामान्यत:  शरीर मूत्र आणि मूत्रपिंडांद्वारे युरीक ॲसिड फिल्टर करते, परंतु जर  शरीर ते फिल्टर करू शकत नसेल तर ते तुमच्या रक्तात जमा होऊ लागते. यूरिक ऍसिडच्या वाढीला Hyperuricemia देखील म्हणतात. यामुळे सांधेदुखीचा आजार होऊन गाउट नावाचा आजार होऊ शकतो. हे तुमचे रक्त आणि मूत्र खूप अम्लीय बनवू शकते. अनुवांशिकता,चुकीचा आहार, सीफूड, राजमा, पनीर आणि तांदूळ जास्त खाल्ल्याने देखील ते वाढू शकते.

जास्त वेळ रिकाम्या पोटी राहणे हे देखील एक कारण असू शकते. मधुमेहाच्या रुग्णांना युरीक ॲसिड असू शकते. लठ्ठपणा आणि जास्त ताण घेतल्यानंही शरीरातील युरीक ॲसिडचे प्रमाण वाढते. युरीक ॲसिड नैसर्गिकरित्या देखील कमी होऊ शकते. 

1) साखरयुक्त अन्नपदार्थांपासून लांब राहा

अलीकडील अभ्यासात साखर देखील कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नामध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारच्या अन्नामुळे यूरिक ऍसिड वाढण्याची शक्यता वाढते. 

2) साखरयुक्त पेय टाळा

साखरयुक्त पेय, सोडा आणि अगदी ताज्या फळांच्या रसांमध्ये देखील फ्रक्टोज आणि ग्लुकोज असते. फ्रक्टोज इतर शर्करांपेक्षा वेगाने शोषून घेते. ते जितक्या वेगाने शोषले जाते तितक्या वेगाने रक्त-शर्करा पातळी आणि यूरिक ऍसिड वाढते. साखरयुक्त पेयांऐवजी फिल्टर केलेले पाणी किंवा फायबरयुक्त पेय,नारळपाणी घ्या.

3) भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्यायल्याने मूत्रपिंडातून युरीक ॲसिड झपाट्याने बाहेर पडतं. पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा. तुम्ही तुमच्या फोनमध्ये वॉटर रिमाइंडर देखील सेट करू शकता.

मसल पॉवरसाठी प्रोटीन डाएट करताय, खा ५ व्हेज पदार्थ- रोजच्या जेवणातच भरपूर ताकद

4) संतुलित आहार

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असल्यास युरिक ऍसिडपासून मुक्ती मिळते. फायबर रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. ड्रायफ्रुट्स, फ्रोझन भाज्या, ओट्ससह 5 ते 10 ग्रॅम सोल्यूबल फायबर्सचा समावेश करा.

5) चांगली झोप घ्या

झोपण्याच्या २ ते ३ तास ​​आधी डिजिटल स्क्रीन वापरणे थांबवा, तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ आणि नियम स्वतः बनवा. दुपारच्या जेवणानंतर कॅफिन घेऊ नका. आहार, व्यायाम आणि उत्तम जीवनशैलीने अनेक आजार अशा प्रकारे टाळता येतात. याशिवाय डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधे घेणेही आवश्यक आहे. असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांच्या मदतीने युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करता येते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य