Join us  

Uric acid removal food : थंडीमुळे गुडघे, कंबरदुखी वाढलीये? शरीरातलं घातक युरीक एसिड बाहेर काढतील ४ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 1:37 PM

Uric acid removal food : वाढलेलं युरीक एसिड कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.  (High uric acid and joint pain home remedies uric acid)

हिवाळ्यात सांधेदुखी किंवा संधीवाताचा त्रास खूप वाढतो. वृद्धत्वामुळे किंवा कोणत्याही दुखापतीमुळे किंवा शरीरात कॅल्शियम, प्रोटीन किंवा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशा अनेक कारणांमुळे सांधेदुखी होऊ शकते. पण, युरिक ऍसिडचे वाढणे देखील सांधेदुखीचे कारण बनते. युरिक एसिड असा केमिकल कंम्पाऊंड आहे जो प्युरिनच्या सेवनानं शरीरात वाढत जातो. यामुळे क्रिस्टल्स तयार होतात जे सांध्यांमध्ये (Joint Pain) जमा राहतात.  वाढलेलं युरीक एसिड कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.  (High uric acid and joint pain home remedies uric acid)

युरिक एसिड कमी करण्याचे घरगुती उपाय

१) लिंबाचा रस

लिंबाचा रस युरिक ऍसिड कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. लिंबू पाणी दिवसातून एक किंवा दोनदा पिऊ शकता. लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते जे यूरिक अॅसिड वितळवण्याचे काम करते. लिंबाशिवाय आवळा, पेरू आणि संत्री यांसारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या इतर गोष्टीही खाऊ शकतात.

२) व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर युरिक ऍसिडमध्ये प्यायला जाऊ शकतो. याचे सेवन करण्यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचा सेंद्रिय सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा आणि दररोज प्या. हे नैसर्गिक क्लीन्सर आणि डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. याशिवाय यामध्ये मॅलिक अॅसिड असते ज्यामुळे यूरिक अॅसिड कमी होते. तुम्ही सफरचंद सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळल्याशिवाय पिऊ नका.

थंडीमुळे खूप आळस येतो, अंग दुखतं? ५ पदार्थ खा, इम्यूनिटी वाढेल, कायम उत्साही राहाल

3) फायबर

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.  ओट्स,  ज्वारी, बाजरी,  केळी या पदार्थांचा आहारात समावेश करा.  फायबरमुळ युरीक एसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

4) चेरीज

एंटी ऑक्सिडंट्सयुक्त चेरी युरिक एसिड कमी करण्यास मदत करते.  त्यात उपस्थित फ्लेनोइड्स सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. 

5) साखरयुक्त पदार्थ

साखरयुक्त पदार्थ आणि पेये युरिक ऍसिड वाढवण्याचे कारण असू शकतात, त्यांच्यापासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. गोड पदार्थांचा तसेच कॅन केलेला आणि फास्ट फूडचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी, अधिक ताजी फळे आणि भाज्या खा.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य