Join us  

Urvashi rautela : समोर आलं उर्वशी रौतेलाच्या परफेक्ट फिगरचं सिक्रेट; पाहा हॉट वर्कआऊट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:07 PM

Urvashi rautela maintains her figure : . तिचे वर्कआऊट पाहून तुमचं मन देखील फिटनेस फ्रिक होण्यासाठी प्रेरित करेल.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  आपल्या ग्लॅमरस स्टाईलशिवाय फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंडवरून आपल्या हार्ड कोर वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या फिटनेसनं ती नेहमीच इतरांना प्रेरणा देते.  अलिकडेच इंस्टाग्रामवर तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती  हॅमर स्ट्रेंथ बेल्ट स्क्वाट्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लोक उर्वशीच्या फिगरचं खूप कौतुक करत आहेत.   

एकदा उर्वशीनं  १००० बेल्ट स्क्वॅट मारले

उर्वशीची परफेक्ट फिगर आणि फिटनेसमागे तिची प्रचंड मेहनत आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता उर्वशी ज्याप्रमाणे हॅमर स्ट्रेंथ बेल्ट स्क्वाट्स वर्कआउट करत आहे ते वाटतं तितकं सोपं नाही. तिनं एक, दोन नाही तर एकूण १००० स्क्वाट पूर्ण केले आहेत. यातून दिसून येतं की या अभिनेत्रीचा स्टॅमिना जबरदस्त आहे. या व्यायामप्रकारानं हिप्सचा आकार वाढण्यास मदत होते. 

पाठ आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो

हॅमर स्ट्रेंथ बेल्ट स्क्वॅट केल्यानं पाठीच्या मासपेशींना आराम मिळतो. योग्य पद्धतीनं हा व्यायाम केल्यास पाठ, पोटाचा खालचा भाग, मांड्यावर जमा झालेले फॅट कमी होण्यास मदत होईल.  बेल्ट स्क्वॅट्स नियमित स्क्वॅट व्यायाम किंवा डेडलिफ्टपेक्षा वेगळे असतात. हा व्यायाम केवळ वेटलिफ्टर्स आणि पॉवरलिफ्टर्ससाठीच फायदेशीर नाही तर ज्या स्त्रिया आई  बनल्या आहेत आणि कमकुवत आहेत त्यांच्यासाठीही हा व्यायाम प्रकार फायदेशीर आहे. 

उर्वशी तिचे सौंदर्य आणि परफेक्ट फिगर टिकवण्यासाठी खूप मेहनत करते. विविध प्रकारच्या स्क्वॅट्स व्यतिरिक्त, ती इतर व्यायाम देखील करते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती रेप्स एक्सरसाइज करताना दिसत आहे. कॅप्शनद्वारे अभिनेत्रीने माहिती दिली होती की तिने 500 REPS, लोअर ABS केले आहे. जर तुम्हाला देखील स्वतःला तंदुरुस्त पाहायचे असेल तर तुम्ही उर्वशीप्रमाणे हे व्यायामप्रकार करून स्वतःला फिट ठेवू शकता. 

या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला जिममध्ये लेग एक्सरसाइज करताना दिसत आहे. मात्र, ट्रेनरच्या अनुपस्थितीमुळे ती मजेदार मूडमध्ये व्यायाम करत आहे. तिचे वर्कआऊट पाहून तुमचं मन देखील तुम्हाला फिटनेस फ्रिक होण्यासाठी प्रेरित करेल. उर्वशीने कॅप्शनमध्ये शेअर केले, 'जेव्हा तुमचे ट्रेनर तुम्हाला जिममध्ये एकटे सोडतात, तेव्हा तुम्ही फक्त व्यायाम करत करता आणि विनोदही करता.'

पुढे तिनं लिहिलंय की, 'आतापर्यंत मला सगळ्यात चांगला सल्ला माझ्या वडीलांकडून मिळाला आहे. रोज एक नवीन मजेशिर काम करावं. इतरांना खुश करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे स्वतः खुश राहायला हवं. हसत राहा, मजा करा.'

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यउर्वशी रौतेलाफिटनेस टिप्ससेलिब्रिटीबॉलिवूड