Join us  

फॅटबर्न करण्यासाठी करिना कपूर बघा किती अवघड व्यायाम करतेय, व्हिडिओ व्हायरल.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 8:13 AM

Kareena Kapoor's Fat Burn Exercise: करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने करिनाचा एक वर्कआऊट व्हिडिओ (workout video) नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. बघा फिटनेस जपण्यासाठी कसा अवघड व्यायाम करतेय करिना...

ठळक मुद्देबघा फिटनेस जपण्यासाठी कसा अवघड व्यायाम करतेय करिना... करिनाचा हा अवघड व्यायाम खरोखरच तिच्या चाहत्यांना फिटनेसाठी मोटीव्हेट करणारा आहे. 

करिना कपूर ही बॉलीवूडच्या काही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. झीरो फिगर, दोन्ही मुलांच्या जन्मानंतर तिने घटवलेलं वजन या सगळ्या गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. करिना सोशल मिडियावरही नेहमी ॲक्टीव्ह असते आणि बऱ्याचदा तिच्या चाहत्यांना ती फिटनेस विषयी काही टिप्स देत असते. काही योगासनं करून दाखवते आणि त्याचे फायदेही समजावून सांगते. आता मात्र करिनाचा जो वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल (Very tough workout by Kareena Kapoor for fat burn) होत आहे, तो व्हिडिओ तिची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.(Kareena Kapoor's Fat Burn Exercise)

नेमका कोणता व्यायाम करतेय करिना?या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तर करिना स्टेप्स वर्कआऊट करताना दिसते आहे. या वर्कआऊटमध्ये एक विशिष्ट गती ठेवून पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या असतात.

विकतचा टोमॅटो सॉस जास्त प्रमाणात खाणं धोक्याचंच, म्हणून घरीच करा हेल्दी सॉस, बघा सोपी रेसिपी

सोहा अली खान बऱ्याचदा स्टेप्स वर्कआऊटमधले अनेक अवघड प्रकार करताना दिसते. स्टेप्स वर्कआऊटनंतर करिनाने पाठीवर ओझं ठेवलं आणि दोन्ही तळपाय, तळहात जमिनीवर टेकवून ॲनिमल वॉक केला. यानंतर तिने काही योगासने केली.

 

योगासने केल्यानंतर तिने पुन्हा जंपिंग जॅक व्यायाम केला. झटपट कॅलरी बर्नसाठी हा व्यायाम उत्तम मानला जातो. यानंतर तिने पाठीवर झोपून दोन्ही पाय सोबतच वर उचलायचे आणि पुन्हा जमिनीवर टेकवायचे, अशा पद्धतीचाही व्यायाम केला.

थंडीमुळे त्वचा कोरडी पडली- सुरकुतलेली वाटतेय? या खास तेलाने करा मालिश, त्वचा दिसेल तुकतुकीत

हा व्यायाम खासकरून पाेट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. सगळ्यात शेवटी तिने मार्जरासन म्हणजेच कॅट- काऊ पोझ हे योगासन केले. हे योगासन केल्यामुळे पाठीच्या मणक्याचा व्यायाम होतो. हा व्यायाम झाल्यानंतर तिने ताठ बसून डोळे मिटून काही मिनिटांसाठी रिलॅक्सेशन केले. करिनाचा हा अवघड व्यायाम खरोखरच तिच्या चाहत्यांना फिटनेसाठी मोटीव्हेट करणारा आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेकरिना कपूर