Join us  

करीना कपूरचे आवडते योगासन करा आणि व्हा शूर योध्यासारखे फिट, पाहा कोणते ते आसन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 5:02 PM

Virabhadrasana: Kareena Kapoor Khan aces the warrior yoga asana, know benefits, technique : करीना कपूरसारखे सुंदर आणि फिट दिसायचे असल्यास तिने सांगितलेलं सिक्रेट योगासन करा...

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या झिरो फिगरमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. जहांगीर आणि तैमूर यांच्या प्रेग्नन्सीनंतर देखील ती तितकीच फिट असल्याचे दिसून येत आहे. करीना तिच्या फिटनेस आणि डाएटची खूपच काळजी घेते. करीना किती फिटनेस फ्रिक आहे हे आपण तिच्या इंस्टाग्राम व्हिडीओमधून पाहतच आलो आहोत. बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा करतात. करीना कपूर ही देखील त्यापैकी एक आहे. ती आपले रोजचे बिझी शेड्युल सांभाळून योगा करण्याला प्राधान्य देते.

करिना सोशल मिडियावरही नेहमी ॲक्टीव्ह असते आणि बऱ्याचदा तिच्या चाहत्यांना ती फिटनेस विषयी काही टिप्स देत असते. काही योगासनं करून दाखवते आणि त्याचे फायदेही समजावून सांगते. आता मात्र करिनाचा जो योगासन करतानाचा  व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो व्हिडिओ तिची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे(Virabhadrasana: Kareena Kapoor Khan aces the warrior yoga asana, know benefits, technique).

करीना कपूर नेमके कोणते योगासन करत आहे? 

या व्हिडिओमध्ये, करीना करत असलेल्या योगासनाला 'वीरभद्रासन' किंवा 'वॉरियर पोझ' असेही म्हणतात. वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या व पाठीचे स्नायू बळकट बनतात. करिनाचे हे अवघड योगासन खरोखरच तिच्या चाहत्यांना फिटनेसाठी मोटीव्हेट करणारे आहे. 

वीरभद्रासन नेमके कसे करायचे ? 

१. सर्वप्रथम सरळ उभे रहा. दोन्ही पायांत ३ ते ४ फूट अंतर असू द्या.२. उजवा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व डावा पाय १५ अंश बाहेरच्या बाजूस वळवा.  ३. उजव्या पायाची टाच डाव्या पावलाच्या मध्यभागी आहे, हे तपासून पहा. ४. दोन्ही हात उचलून खांद्यांच्या रेषेत आणावे, हाताचे तळवे खालच्या दिशेस असावे. ५. हात जमिनीस समांतर राहतील, याची खात्री करून घ्यावी. ६. श्वास सोडा आणि उजव्या गुडघ्यातून हलकेच खाली वाका.७. आपला उजवा गुडघा आणि घोटा एका रेषेत आहे ना, तसेच उजवा गुडघा उजव्या घोटेच्या पुढे नाही ना ह्याची दक्षता घ्यावी. ८. आता उजवी कडे वळून पहा.९. या आसनात स्थिर होताच हात आणखीन ताणून घ्यावेत. १०. कंबर आणखी थोडी खाली दाबायचा हलकासा प्रयत्न करा. एका योध्याच्या जिद्दीने हे आसन स्थिर ठेवा. खाली वाकताना श्वासोच्छवास चालूच ठेवा.११. श्वास घेत सरळ व्हा.१२ श्वास सोडता सोडता दोन्ही हात खाली आणा.१३. अगदी अशाच प्रकारे डाव्या बाजूसही करा. (डावा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व उजवा पाय १५ अंश.)

वीरभद्रासन योगासनाचे नेमके फायदे कोणते आहेत? १. हात पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते व ते सुडौल बनतात.२. शरीर संतुलित राहते व काम करण्याची क्षमता वाढते.३. या योग मुद्रेत पाय आणि बाजुंना शक्ती मिळते.४. शरीराचा खालील भाग स्वस्थ राहण्यास मदत होते.५. स्नायूंना बळकटी मिळाल्याने शरीराला योग्य आकार प्राप्त होतो.

टॅग्स :फिटनेस टिप्स