Join us  

Virat kohli drinks black water : साधं पाणी नाही तर विराट कोहली पितो खास 'अल्कलाइन वॉटर; 'या' पाण्याची किंमत, खासियत जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 3:00 PM

Virat kohli drinks black water : फक्त विराटच नाही तर अभिनेत्री अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, श्रृती हसनपासून बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरनंही अल्कलाईन वॉटरचे फायदे लक्षात घेत याचं सेवन करायला सुरूवात केली.

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींमध्ये अल्कलाईन वॉटरची मागणी वाढली आहे. नैसर्गिकरित्या बायोकार्बोनेट असलेल्या पाण्याला अल्कलाईन वॉटर म्हणतात. क्रिकेटपटू विराट कोहलीने याबाबत सर्वप्रथम चर्चा केली आहे. ट्विटरवर एका मजेदार प्रश्नोत्तराच्या सत्रात कोहलीने सांगितले की, तो घरी अल्कलाईन वॉटर पितो.  त्यानं इंस्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की मी अल्कलाईन वॉटर ट्राय केले आहे. पण मी नियमित हे पाणी पित नाही. आम्ही घरी अल्कलाईन वॉटर पितो. फक्त विराटच नाही तर अभिनेत्री अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, श्रृती हसनपासून बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरनंही अल्कलाईन वॉटरचे फायदे लक्षात घेत याचं सेवन करायला सुरूवात केली. (Virat kohli drinks black water read health benefits of alkaline water) 

या पाण्याची किंमत 3 ते 4 हजार प्रति लिटर  एवढी असते. हे पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात.अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असल्याने, हे पाणी फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते असे मानले जाते. सामान्य पाण्याची pH पातळी 6.5-7.5 दरम्यान असते, तर या पाण्याची pH पातळी 8-10 च्या दरम्यान मानली जाते. या कारणास्तव ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

हॅवेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. सुरेश सिसोदिया म्हणाले की, ''अल्कलाईन वॉटर प्यायल्याने रक्ताभिसरण प्रणालीची कार्यक्षमता सुधारते. त्यांच्या मते, यामुळे रक्ताच्या गुणवत्तेत अशा प्रकारे बदल होतो की शरीराच्या आवश्यक अवयवांना अधिकाधिक ऑक्सिजन मिळतो. अल्कलाईन वॉटर परजीवी आणि संक्रमणांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

शरीर डिटॉक्स होते

एव्हिडन्स बेस्ड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अल्कलाईन वॉटर  वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. शरीराच्या pH पातळीचे नियमन करण्यासाठी आणि कर्करोगासारख्या जुनाट आजारांसाठी देखील हे वरदान आहे. असे म्हटले जाते की अल्कलाईन वॉटर शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकते आणि शरीर ते सहजपणे शोषून घेते.

सामान्य पिण्याच्या पाण्यापेक्षा या पाण्यात pH पातळी जास्त असते. यामुळे तुमच्या शरीरातील अॅसिड नष्ट होते. हे ऑक्सिडेशन रिअॅक्शन पोटेंशिअल (ओआरपी) देखील कमी करते, ज्यामुळे पाण्यात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते. ORP ही पाण्याची अँटिऑक्सिडंट म्हणून काम करण्याची क्षमता आहे. ORP मूल्य जितके कमी असेल तितकी पाण्याची अँटिऑक्सिडंट क्षमता जास्त असेल.

अल्कलाईन वॉटर सेवनाचे फायदे

डॉ. सिसोदिया म्हणतात की अल्कलाईन वॉटर प्यायल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. हे पाणी नियमितपणे प्यायल्याने केवळ हाडे मजबूत होत नाहीत तर वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अल्कलाईन वॉटर खूप प्रभावी आहे. हे पाणी सिस्टोलिक रक्ताचा चिकटपणा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हाय बीपीच्या समस्येवर मात करण्यासाठी या पाण्याचे सेवन करणे चांगले.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी अल्कलाईन वॉटर वापर केला जाऊ शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की इलेक्ट्रोलायझ्ड अल्कलाईन वॉटरमध्ये स्थूलताविरोधी प्रभाव असतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे पाणी खूप फायदेशीर आहे.

हाडं चांगली राहतात

अल्कलाईन वॉटर देखील हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हाडांना इजा करणारे घटक कमी होण्यास मदत होते.  त्यामुळे अल्कलाईन वॉटरचे  सेवन केल्याने हाडे निरोगी राहण्यास मदत होते.

डायबिटीस नियंत्रणात राहते

डायबिटीक रुग्णांसाठी  अल्कलाईन वॉटर खूप चांगले मानले जाते. अल्कलाईन वॉटरचा  डायबिटीसविरोधी प्रभाव असतो. या आधारावर असे मानले जाऊ शकते की या पाण्यात मधुमेह नियंत्रित करण्याची मोठी क्षमता आहे.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यविराट कोहलीअनुष्का शर्मा