विराट कोहली फक्त क्रिकेटसाठी नसून, फिटनेससाठीही ओळखला जातो (Virat Kohli). त्याने स्वतःवर खूप मेहनत घेतली आहे. विराट डाएट काटेकोरपणे फॉलो करतो (Fitness). काही मुलाखतींमध्ये विराट कोहलीने त्याच्या आहाराविषयी माहिती दिली आहे. या मुलाखतीत कमेण्टेटर जतिन सप्रू यांनी विराट कोहली फक्त वाफाळलेल्या भाज्या खातो. ज्यामध्ये मसाले अजिबात नसतात. असं सांगितलं.
वाफाळलेल्या भाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोषणतज्ज्ञ रुपाली महाजन यांच्या म्हणण्यानुसार, 'अनेक वेळा आपण भाज्या बनवण्याच्या पद्धतींकडे लक्ष देत नाही, त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. ज्यामुळे शरीराला पौष्टीक घटक मिळत नाही. त्यामुळे वाफवलेल्या भाज्या खा'(Virat Kohli prioritises nutrition over taste, reveals Jatin Sapru).
पुरेसे पोषण मिळेल
काही लोकांना वाफवलेल्या भाज्या खायला आवडत नाही. पण या भाज्यांमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि खनिजे भरपूर असतात. जेव्हा भाज्या वाफवल्या जातात तेव्हा त्यातील पोषक घटक टिकून राहतात, ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.
वेट लॉस करण्यास मदत
वाफवलेल्या भाज्यांमध्ये खूप कमी फॅट आणि कॅलरीज असतात. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. यासह आपण जास्त खाणंही टाळतो. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.
पचनक्रिया राहते उत्तम
वाफवलेल्या भाज्या खाल्ल्याने पचनक्रिया उत्तम राहते. वाफवलेल्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे खाल्लेलं व्यवस्थित पचते.
मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी उत्तम
वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..
तळलेल्या भाज्यांऐवजी वाफवलेल्या भाज्या खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. वाफवलेल्या भाज्यांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते. अशा परिस्थितीत उकडलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करून रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते.
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते
वाफवलेल्या भाज्या डोळ्यांसाठी उत्तम ठरतात. काही भाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे कॅरोटीनोइड्स असतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते.
कोणती भाजी कशी वाफवायची ते जाणून घ्या
गाजर, मटार, ब्रोकोली, सिमला मिरची यांसारख्या भाज्या - या फक्त ८ ते १० मिनिटांसाठी वाफेवर शिजवा.
पालेभाज्या ५ मिनिटांसाठी वाफेवर शिजवा.
फ्रेंच बिन्स - ५ ते ७ मिनिटांसाठी वाफेवर शिजवा.
लेकीला खांद्यावर घेऊन चालणारा रोहित आणि सोबत रितिका, वाचा रोहित - रीतिकाची खास लव्हस्टोरी
बटाटे - बटाटे १० ते १२ मिनिटात वाफेवर शिजतात.
दिवसभरात वाफवलेल्या भाज्या कधी खाव्या?
जेवणापूर्वी वाफवलेल्या भाज्यांचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. म्हणजेच रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी खाल्ले तर ते पचायला सोपे जाते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.