भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले. मागील काही दिवसांपासून विराट आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडेल अशा चर्चा होत्या. विराट जगभरातील सगळ्यात फिट एथलिटपैकी एक आहे. प्रत्येकाने त्याला मैदानावर आक्रमकपणे खेळताना, विकेट्स दरम्यान अतुलनीय उर्जा घेऊन धावताना, रन-मशीन सारखा स्कोअर मिळवताना पाहिले आहे. पण विराट कोहली सारखे शरीर मिळवण्यासाठी काय लागते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत ज्याच्या आधारे तुम्हीही त्याच्याप्रमाणे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करू शकता.
32 वर्षीय फलंदाज, जो जगभरातील लोकांचा फिटनेस आयकॉन आहे, इंटेस वर्कआउट्स आणि कंपाऊंड्स प्रॅक्टिससाठी आधी विराट तेवढा वेडा नव्हता जितका तो आता आहे. विराटचे वजन कमी करण्याचे परिवर्तन एका रात्रीत झाले नाही. त्याने कमी कार्ब आहार, हेल्दी फॅट्स, उच्च तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामाचा सातत्याने सराव केला आहे. ज्यामुळे तो कर्णधार बनला. तुम्ही देखील विराट कोहलीने फॉलो केलेल्या टिप्स आपल्या रोजच्या जीवनात वापरून आपली जीवनशैली सुधारू शकता.
धावण्याचा व्यायाम
आधी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करणे महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी, आपल्या व्यायामामध्ये धावणं समाविष्ट करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक व्यायामांमध्ये धावणं हा सर्वात महत्वाचा आणि सोपा व्यायाम आहे. धावणे आपल्याला मजबूत स्नायू तयार करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. ट्रेडमिलवर धावल्याने एका तासात सरासरी 705 ते 865 कॅलरीज बर्न होतात आणि मन शांतही होते.
तुमच्याकडे कदाचित स्टार क्रिकेटरसारखी समृद्ध जीवनशैली नसेल पण तुम्हाला विराट कोहलीसारखे सिक्स-पॅक अॅब्स मिळू शकतात. क्रंच किंवा सिट-अप करण्यासाठी कोणत्याही फॅन्सी जिम उपकरणांची आवश्यकता नसते. आपल्याला फक्त तंदुरुस्त राहण्यासाठी थोडी जागा आणि निर्धार हवा आहे. दररोज 10 मिनिटांचे क्रंचेस व्यायाम 54 कॅलरीज बर्न करू शकते. हे आपल्या मुख्य स्नायूंना बळकट करण्यास आणि आपल्या शरीराची गतिशीलता आणि लवचिकता वाढविण्यात मदत करते.
स्विमिंग
जेव्हा व्यायामाचा विचार केला जातो तेव्हा पोहणे हा व्यायाम काही आठवड्यांत आपले वजन कमी करण्यास मदत करू शकतो. जॉगिंग किंवा धावण्याव्यतिरिक्त पोटातील चरबी कमी करण्यासाठी पोहणं सर्वोत्तम व्यायाम आहे. कारण पोहणे तुम्हाला तुमच्या स्नायूंना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते.
हेवी लिफ्टींग
जर तुम्हाला देखील कोहली सारखे उत्तम शरीर हवे असेल तर वजन उचलण्याबाबत संकोच बाळगू नका. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार शक्य तितके जड उचलण्याचे ध्येय ठेवा. जड वजन उचलण्याद्वारे, तुम्हाला काही दिवसांत कोहलीसारखे स्नायू आणि टोन्ड पाय मिळतील. विराटने म्हटल्याप्रमाणे, 'मेहनतीला शॉर्टकट नाहीत', वेट ट्रेनिंगसाठी सतत प्रयत्न आणि खूप संयम आवश्यक असतो.
आहार
कोहलीने आपल्या डाएटमध्ये पूर्णपणे हिरव्या भाज्यांचा समावेश केला आहे. व्हेजिटेरीयन आणि वेगन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगन डाएटमध्ये दुधापासून तयार कोणत्याही पदार्थांचं सेवन केलं जात नाही तर व्हेजिटेरीयनमध्ये या पदार्थांचा समावेश केला जाऊ शकतो. विराट कोहलीच्या डाएटमध्ये आता वेगवेगळे धान्यांचाही समावेश करण्यात आला आहे. फळांच्या सेवनावरही तो जास्त भर देत आहे. सोया पनीरचाही यात समावेश करण्यात आला आहे. वेगन डाएटमध्ये जनावरांपासून तयार कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही.
वेगन डाएट पूर्णपणे फायबरने युक्त असते. याने पचनक्रिया अधिक मजबूत होते. विराटने वनस्पती तेलाचा वापर करणे सुरु केले आहे. त्याच्यासोबत आणखीही काही खेळाडूंनी या डाएटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स सुद्धा हा डाएट प्लॅन फॉलो करते. वेगन डाएट फॉलो करणारे सांगतात की, हा डाएट प्लॅन माणसाला आनंदी ठेवण्यासाठी फार मदत करतो.