निरोगी राहण्यासाठी शरीराला पोषक तत्वांची आवश्यकता असते. ही पोषक तत्व आहारातून मिळतात. संतुलित आहारात व्हिटामीन्स मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्ससह इतर तत्वांचा समावेश असतो. व्हिटामीन बी-१२ आरोग्यासाठी महत्वाचं आहे. यामुळे गंभीर आजारांपासून लांब राहण्यास मदत होते. या आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज संतुलित आहार घ्यायला हवा. डाएट चार्टनुसार पुरूषांना रोज २.४ mcg आणि महिलांना 2.6mcg व्हिटामीन्सची आवश्यकता असते.
व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी आवश्यक आहे. व्हिटामीन सी आण डीच्या समान असते. इंग्रजीत याला कोबालमीन (Cobalamin) म्हणतात. यात कोबाल्ट असते. जे इतर व्हिटामीन्समध्ये मिळत नाहीत. हे लाल रक्त पेशींसाठी गरजेचे असते. यामुळे ब्रेन हेमरेजचा धोका कमी होतो.
व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणं
- थकवा
-अशक्तपणा
- शरीरात रक्ताची कमतरता
- डोकेदुखी
- भूक न लागणे
- त्वचेमध्ये फिकटपणा
- तोंडात फोड येणे
- तणाव
यासाठी आहारात मासे, शेंगा, अंडी, बीन्स आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करा. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, पनीर, ताक इत्यादींचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन बी-12 आढळते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन बी-12 महत्त्वाची भूमिका बजावते. रक्तातील व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे, आरबीसीची संख्या देखील कमी होऊ लागते. या गोष्टींचे सेवन केल्याने शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता उद्भवत नाही.
व्हिटामीन बी नं परिपूर्ण खाद्यपदार्थ
१) अंड्याला सुपरफूड म्हटलं जात. शरीरात व्हिटामीन B-12 च्या कमतरता अंड्याच्या सेवनानं पूर्ण केली जाते. रोज २ अंडी खाल्ल्यानं व्हिटामीन बी च्या दैनिक गरजेच्या जवळपास ४६ टक्के गरज पूर्ण करते.
२) सोयाबीनमध्ये व्हिाटामीन बी १२ मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही सोया मिल्क, टोफू, सोयाबीन या पदार्थांचे सेवन करू शकता.
३) दह्यात व्हिटामीन बी १, बी २ आणि बी १२ असते. आहारातील प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही दह्याचा समावेश करायला हवा.
४) ओट्स खाल्ल्यानं फायबर्स आणि व्हिटामीन्स मिळतात. ओट्समध्ये व्हिटामीन बी १२ असते. यामुळे शरीर हेल्दी राहण्यात मदत होते.
५) व्हिटामीन बी १२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात दुधाचा समावेश करा. दूधातून चांगल्या प्रमाणात व्हिटामीन बी-१२ मिळते.
६) आहारात ब्रोकोलीचा समावेश करा. यात व्हिटामीन १२ बरोबर फोलेट म्हणजेच फोलकि एसिड्स असतात. यामुळे शरीरातलं हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.