Join us  

कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 1:14 PM

Vitamin B12 Foods : शेंगदाण्यांमध्ये मँगनीजही मोठ्या प्रमाणात असते. डायबिटीक रुग्णांसाठी हा उत्तम पर्याय आहे.  

कॅल्शियमची  हाडांच्या मजबूतीसाठी आणि प्रोटीनची मांसपेशी वाढवण्यासाठी आणि त्याच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. त्याचप्रमाणे व्हिटामीन बी-१२  हाडांपासून मांसपेशी, त्वचा, केस आणि इम्यून सिस्टिम, नर्व्हस सिस्टिमसाठी आवश्यक असते. (Peanut Is Good Source Of Vitamin B-12) व्हिटामीन बी-१२ एक पाण्यात विरघळणारा पदार्थ आहे. जो  अनेक खाद्यपदार्थांमध्ये उपलब्ध असतो. हे सप्लिमेंट्स तुम्ही औषधांच्या स्वरूपात वापरू शकता. (Vitamin B12 Foods)

व्हिटामीन बी -१२ च्या कमतरतेमुळे मांसपेशी कमकुवत होणं,  हात-पाय सुन्न पडणं, हाता-पायांमध्ये झिणझिण्या येणं, चालण्यात त्रास होणं, भूक न लागणं, वजन कमी होणं, चिडचिड होणं, थकवा, हाडांमध्ये वेदना अशा समस्या जाणवतात. (Peanut Is Good Source Of Vitamin B-12)

रोजच्या आहारात व्हिटामीन बी-१२ ची आवश्यकता किती असते? 

१४ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना रोज २.४ एमसीजी व्हिटामीन बी-१२ ची आवश्यकता असते तर स्तनपान करणाऱ्या महिलांना  २.८ एमसीजी व्हिटामीन बी-१२ ची गरज असते. व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांमध्ये मांस, पोल्ट्री, अंडी, डेअरी उत्पादनांचा समावेश आहे. दूध दही, व्हिटामीनयुक्त पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

केस खूपच पातळ झालेत? दाट-लांब केसांसाठी खा 'हे' ५ आंबट पदार्थ, पटापट वाढतील केस

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार शेंगदाण्यांमध्ये व्हिटामीन बी-3 आणि नियाससिनचे प्रमाण चांगले असते. शेंगदाण्यांकडे बोअरिंग पदार्थ म्हणून पाहिले जाते. चटणी, चिक्की, भाजी, उपवासाचे पदार्थ अशा अनेक  गोष्टीत शेंगदाण्यााचा वापर केला जातो. तर काहीजण  खारे शेंगदाणे खातात.  व्हिटामीन बी-12 मिळवण्यासाठी तुम्ही बदामासह शेंगदाण्यांचाही आहारात समावेश करू शकता. शेंगदाण्यांमध्ये जवळपास 567 कॅलरीज असतात, 25.8 ग्राम प्रोटीन असते. 16.1 ग्राम कार्ब्स, 4.7 ग्रॅम शुगर असते, फायबर्स 8.5 ग्रॅम असते. 

ज्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते आणि मेमरी शार्प होण्यासही मदत होते.  यात रेसवेराट्रॉल नावाचे फ्लेवोनॉई्डस असतात ज्यामुळे मेंदूमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. शेंगदाण्यांमध्ये मँगनीजही मोठ्या प्रमाणात असते. डायबिटीक रुग्णांसाठी हा उत्तम पर्याय आहे.  ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट होण्यास मदत होते.  याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. 

रिसर्चनुसार नाश्त्याला किंवा जेवणाला शेंगदाणे असलेल्या पदार्थांचा समावेश केला तर तासनतास भूक लागत नाही बराचवेळ पोट भरलेलं राहतं. याव्यतिरिक्त डेजर्ट  किंवा चिक्की बनवण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचा वापर करू शकता. यामुळे फक्त चवच वाढत नाहीतर पदार्थही हेल्दी बनतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स