Lokmat Sakhi >Fitness > सरळ चालण्यापेक्षा 'उलटं चालणं' जास्त चांगले; शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे

सरळ चालण्यापेक्षा 'उलटं चालणं' जास्त चांगले; शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे

सहसा लोक फिट राहण्यासाठी वेगाने चालतात किंवा धावतात, पण तुम्हाला माहिती आहे का की सरळ चालण्यापेक्षा उलट चालणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:13 IST2025-01-11T12:09:08+5:302025-01-11T12:13:59+5:30

सहसा लोक फिट राहण्यासाठी वेगाने चालतात किंवा धावतात, पण तुम्हाला माहिती आहे का की सरळ चालण्यापेक्षा उलट चालणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. 

walking backside is more beneficial than walking straight your body will get 6 tremendous benefits | सरळ चालण्यापेक्षा 'उलटं चालणं' जास्त चांगले; शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे

सरळ चालण्यापेक्षा 'उलटं चालणं' जास्त चांगले; शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे

सहसा लोक फिट राहण्यासाठी वेगाने चालतात किंवा धावतात, पण तुम्हाला माहिती आहे का की सरळ चालण्यापेक्षा उलट चालणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की, उलटे चालल्याने बॅलेन्स, फोकस आणि फिटनेसमध्ये सुधारणा होते. उलटे चालण्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊया, जे तुमचे आरोग्य सुधारू शकतात.

स्नायू बळकट होतात

उलटे चालल्याने त्या स्नायूंवर काम केले जाते जे सरळ चालताना कमी सक्रिय असतात. विशेषतः मांड्या, गुडघे याचे स्नायू बळकट होतात. हे पायांची ताकद वाढवण्यास आणि दुखापत होण्याता धोका कमी करण्यास मदत करतात.

मणक्यावरील ताण कमी होतो

उलटे चालल्याने पाठीच्या कण्यावरील आणि मणक्यावरील ताण कमी होतो. शरीराची स्थिती सुधारते आणि पाठदुखी कमी करण्यास उपयुक्त ठरते.

गुडघ्यासाठी फायदेशीर

गुडघेदुखी किंवा संधिवात यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी उलटे चालणे हे वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे गुडघ्यांवरील दाब कमी होतो आणि सांधे लवचिक होतात.

मेंदूला चालना

उलटे चालल्याने तुमच्या मेंदूला नवीन आव्हान मिळते. हे मेंदू-समन्वय आणि संतुलन सुधारते. संशोधनातून असे दिसून आले आहे की उलटे चालल्याने स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित होते.

वजन कमी होण्यास मदत 

सरळ चालण्यापेक्षा उलटे चालण्यात जास्त ऊर्जा लागते. यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी 

उलटे चालल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
 

Web Title: walking backside is more beneficial than walking straight your body will get 6 tremendous benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.