Join us  

नवरात्रीत अनवाणी चालताय? जाणून घ्या फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 8:09 PM

नवरात्रीत चप्पल न घालणे हे आपल्याला धार्मिक वाटत असले तरी त्यामागेही शास्त्रीय कारण आहे. काय आहेत अनवाणी चालण्याचे फायदे पाहूया...

ठळक मुद्देअनवाणी चालणे हे फक्त धार्मिक नसून त्यामागे शास्त्रीय कारणे पण आहेतनैसर्गिक गोष्टींशी संपर्क आल्याने पाय खऱ्या अर्थाने जमिनीवर राहतात

अर्थिंग किंवा ग्राऊंडिंग हे शब्द आपण इलेक्ट्रिक क्षेत्रात वापरले आहेत. अर्थिंग म्हणजे काय तर जमिनीमध्ये २.५ ते ३ मीटर खोल खड्डा करून त्यामधे कॉपरचा पाईप टाकला जातो. आपण रोजच्या व्यवहारात अनेक उपकरणे वापरतो. फ्रीज, टिव्ही,मिक्सर,इ.या गोष्टींचे अर्थिंग करणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा ही उपकरणे मोठमोठ्या कंपनीमध्ये वापरली जातात तेव्हा त्याठिकाणी शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते. घरामध्येसुद्धा जिथे ग्राऊंडिंग नसते तिथे शॉक लागतो म्हणून घरात एक थ्रीपीनचा सॉकेट असतो जो अर्थिंग पॉईंट असतो. जेव्हा केव्हा आपल्या घरात शॉर्टसर्किट होतो किंवा करंट लीक होत असेल तेव्हा जमिनीत सोडला जातो. त्यामुळे आपली विद्युत उपकरणे सुरक्षित राहतात.

अर्थिंग -

म्हणजेच भूसंपर्क अर्थिंग म्हणजे पृथ्वीच्या अशा भागाशी संपर्क साधणे ज्यातून करंट पुढे जाऊ शकत नाही, यालाच आपण मातृभागाशी संपर्क असेही म्हणू शकतो. ग्राऊंडिंग म्हणजे पृथ्वीच्या अशा भागाशी संपर्क साधणे ज्यातून जिवंत अणु रेणू संपर्कात येतो. पंचमहाभूतांपैकी एक पृथ्वी (पृथ्वी,आप (जल), तेज(अग्नी), वायू ,आकाश) या सर्व महाशक्ती आहेत. मानवी शरीर या पाच तत्त्वांनी बनलेले आहे, म्हणून जर या पंचतत्वाचे समत्व बिघडले की आजार चालू होतात. मग या महाशक्तींचा आपल्या आयुष्यात चांगल्या आरोग्यासाठी कसा उपयोग करुन घेता येईल?

याचे उत्तर अगदी सोपे आहे. आपले आजी आजोबा नेहमी सांगायचे गवतावरून अनवाणी चाला, नजर चांगली राहील ते खोटे नाही. या उपायांना आपण नॅचरोपॅथी म्हणजेच निसर्गोपचार म्हणतो. म्हणजे कुठलेही औषध किंवा शल्यचिकित्सा यांचा वापर न करता पंचमहाभूतांचा वापर करून रोग किंवा आजार बरा करणे.

अनवाणी चालण्याचे फायदे  

शारीरिक फायदे

१)गुडघेदुखी, कंबरदुखी कमी होण्यास मदत होते.

२)डोळ्यांचे विकार कमी होऊन नजर चांगली होते.

३)मासपेशींची ताकद व लवचिकता वाढायला मदत होते.

४)रक्ताभिसरण संस्था कार्यरत होते व प्रत्येक अणुरेणूंपर्यंत प्राणवायू पोहोचला जातो.

५)हृदयापर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होतो व हृदयाचे आरोग्य टिकून राहते त्यामुळे आयुर्मान वाढते.

६)नवरात्रीमध्ये अनेक लोक देवळात चालत जातात. तिथून परत येण्यासाठी चालण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. त्यामुळे ते अंतर पूर्ण चालावे लागते व त्याचा फायदा म्हणजे अर्धे चालून दमले तरी ते अंतर पूर्ण करावे लागते.

७)शरीरातील विद्युत घटक (टॉक्सिन) जमिनीकडे ओढले जाऊन बाहेर पडतात.

८)पायांना जमिनीवरील खड्डे, गोटे यांमुळे एक्युप्रेशर होते व पूर्ण नासा मोकळ्या होतात. मधुमेह, हृदयरोग,त्वचारोग, मानसिक आरोग्यासाठी उत्तम ठरते व मेंदू पर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होतो.

मानसिक फायदे

१) तुम्ही निसर्गाच्या जवळ जाता,निसर्गाची जाणीव होते.

२) जमीन, माती ,दगड गोटे इ.पृथ्वीतत्त्वात येतात. यावर चालणे म्हणजे प्रत्येक वेळेस एक नवीन आव्हान. पुढे जमिनीवर काय येईल सांगता येत नाही. 

३) प्रत्येक प्रथेमागे एक शास्त्र असते. अशाप्रकारे अनवाणी चालण्याने मनाची ताकद नक्कीच वाढते.

४)मन जिथे खंबीर व निरोगी तिथे शरीर निरोगी राहते.

५)मानसिक ताण कमी होतो,चिडचिड कमी होते.

६)सकारात्मकता वाढते,मन उत्साही होते.

चालू करताना काय काळजी घ्याल 

१)पहिल्या दिवशी हळू चालण्यास सुरुवात करावी ,काही लागू नये याची दक्षता घ्यावी. चुकून लागल्यास त्वरित इलाज करावा. जखम भरून येत असल्याची खात्री करावी. 

२) रोज १० ते १५ अनवाणी चालणे सुरुवातीच्या टप्प्यात खूप झाले. 

३) शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहील याची काळजी घ्यावी. 

मनाली मगर-कदम 

फिटनेसतज्ज्ञ

manali227@gmail.com

टॅग्स :फिटनेस टिप्सनवरात्री