Lokmat Sakhi >Fitness > बारीक दिसाचंय पण व्यायामाला वेळच नाही? रोज 'इतकी' पाऊलं चाला, पटापट वजन कमी होईल

बारीक दिसाचंय पण व्यायामाला वेळच नाही? रोज 'इतकी' पाऊलं चाला, पटापट वजन कमी होईल

Walking Benefits for Weight Loss (Walksathi Yogy Vel Konti Aahe) : मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी रोज कमीत कमी ४ हजार ४ हजार पाऊलं चालायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:17 AM2023-11-12T09:17:15+5:302023-11-12T09:27:09+5:30

Walking Benefits for Weight Loss (Walksathi Yogy Vel Konti Aahe) : मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी रोज कमीत कमी ४ हजार ४ हजार पाऊलं चालायला हवं.

Walking Benefits for Weight Loss : Which is Right Way to Walk Know About Right time for walk | बारीक दिसाचंय पण व्यायामाला वेळच नाही? रोज 'इतकी' पाऊलं चाला, पटापट वजन कमी होईल

बारीक दिसाचंय पण व्यायामाला वेळच नाही? रोज 'इतकी' पाऊलं चाला, पटापट वजन कमी होईल

जर तुम्ही कायम मेंटेन राहू इच्छित असाल आणि व्यायामासाठी फार वेळ मिळत नसेल तर नियमित चालून तुम्ही मेंटेन राहू शकता. एका दिवसात किती चालायला हवं हे सुद्धा महत्वाचे असते. (Walk sathi yogya vel konti ahe) एक्सपर्ट्सच्या मते किलोमीटरऐवजी तुम्ही मिनिटांनुसार  चालण्याचा वेळ मोजावा.  उदाहरणार्थ जर तुम्ही ५ किलोमीटर चालण्यावर लक्ष ठेवले तर फक्त ४५ मिनिटं चालाल.

निरोगी दीर्घायुष्यासाठी  व्यायाम करणं फायदेशीर मानले जाते. (Walking Benefits for Weight Loss) साइंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या २०१८ च्या अभ्यासानुसार  रोज  जवळपास १० हजार पाऊल चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.  पण हा एक आदर्श बेंचमार्क नाही. फिजिकल हेल्थसाठी हा योग्य संकेत नाही. (Which is Right Way to Walk Know About Right time for walk)

हार्वर्ड युनिव्हर्सिटी एसोसिएट ब्रिघमद्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार आणि जेएएमए इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी रोज कमीत कमी ४ हजार ४ हजार पाऊलं चालायला हवं. जवळपास  ७,५०० पाऊलं चालणं आणि इंटेस व्यायाम गरजेचा असतो. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी कमीत कमी २० मिनिटं व्यायाम करण्याचे टार्गेट असायला हवं.

वयाच्या ५८ व्या वर्षीही सुपरफिट-हॉट दिसणारे मिलिंद सोमण काय खातात? पाहा साधा डाएट प्लॅन

चालताना कोणत्या चुका टाळाव्यात (These Mistakes Should Avoid while Walking)

चालताना शरीराचे पोश्चर सरळ असावे. हातांच्या मुठा बंद नसाव्यात, छातीचा भाग सरळ ठेवून खांदे वर खाली करत पायी चााला, पायी चालताना  हातांचा कोपरा ९० अंशात वाकवा. पायी चालताना डोकं सरळ ठेवा. पीठ आणि खांदे वाकवू नका सरळ चालण्याचा प्रयत्न करा. पाय जमिनीवर खाली ठेवून चाला. चालताना खांद्याचीही थोडी-फार हालचाल करा. चालताना लोक खूप लवकर बोअर होतात. कोणाशीही बोलत-बोलत जास्तवेळ वॉक करत राहतात. फक्त १० ते १५ मिनिटेच वॉक करा. अन्यथा त्यांना थकवा येऊ शकता. पण रोज कमीत कमी ३० मिनिटांचा वॉक गरजेचा असतो. 

वयानुसार किती चालायचं? 

५ ते १८ वय वर्ष वयोगटातील लोकांनी रोज १३ हजार पाऊलं चालायला हवं. १९ ते ४० वयोगगटातील पुरूष आणि महिलांनी १४ हजारांपेक्षा जास्त पाऊले चालावे. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी रोज १२ हजार पाऊलं चालावे. ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांनी कमीत कमी १० हजार पाऊलं चालायला हवं. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी ७ हजार पाऊलं चालायला हवं. 

Web Title: Walking Benefits for Weight Loss : Which is Right Way to Walk Know About Right time for walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.