वजन कमी करण्यासाठी तुम्हीही रोज चालता का? नियमित चालल्याने शरीराचा उत्तम व्यायाम होतो (Weight Loss). पण अनेकांचं नियमित वॉकिंग करूनही वजन घटत नाही (Walking). अशावेळी नेमकं किती वेळ चालावं? कोणत्या वेळी चालल्याने आरोग्याला फायदा होईल? सकाळी की सायंकाळी, कोणत्या वेळी चालल्याने वजन कमी होईल?
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या वेब साईटनुसार, वेट लॉससाठी वॉकिंग फायदेशीर ठरू शकतं. नियमित ३ ते ४ किलोमीटर चालल्याने कॅलरीज बऱ्याच प्रमाणात बर्न होतात. दररोज ४० मिनिटे चालल्याने बेली फॅट कमी ते बरेच फायदे आरोग्याला होतात(Walking But Not Losing Weight? Here's Why).
वेट लॉससाठी चालण्याची योग्य वेळ
सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, वजन कमी करण्यासाठी चालण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ. आपण सकाळी रिकाम्या पोटी वॉकिंग करू शकता. यावेळी चालल्याने शरीरातील फॅट्स झरझर कमी करण्यास मदत होऊ शकते. ज्यामुळे वजन कमी करणे अधिक सोपे होईल.
बदामच कशाला हवेत, 'या' ५ गोष्टी रोज पाण्यात भिजवून खा; बळकट हाडं - पोलादी होईल शरीर
वजन कमी करण्यासाठी कसे चालायचे?
वजन कमी करण्यासाठी ४० मिनिटे वेगाने चाला. ब्रिस्क वॉक केल्याने कॅलरीज तर बर्न होतातच. शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारते. सकाळी रिकाम्या पोटी ब्रिस्क वॉक केल्याने मेटाबॉलिज्म वाढते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न योग्यरित्या पचते, आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.
वॉकिंग करताना लक्षात ठेवा काही गोष्टी
- चालण्यासाठी लांब अंतराची जागा निवडा.
- ट्रेडमिलवर चालत असताना, एकाच वेगाने चाला.
आजी झालेल्या नीता अंबानी फिटनेससाठी रोज खातात ' हा ' पदार्थ, दिसतात फ्रेश आणि तरुण
- वॉकिंग किंवा जॉगिंग आधी ग्रीन टी किंवा कोमट पाणी प्या.
- नियमित ६ हजार किंवा १० हजार पावलं चाला.
- वॉकिंग करण्याच्या काही वेळानंतर हेल्दी ब्रेकफास्ट करा.