चालणं हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम व्यायाम आहे, ज्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. हा अतिशय प्रभावी व्यायाम असून तो कोणत्याही वयात करता येतो. रोज चालण्यामुळे वजन कमी होण्यास भरपूर मदत होते. हा एक लो इंटे्न्सिटी व्यायाम असला तरी चालण्याने वजन खूप कमी होऊ शकतं. याबाबत अधिक जाणून घेऊया...
वेगाने चालण्याने वजन कमी होऊ शकतं. पटापट चालण्याने हार्ट रेट वाढतो आणि जास्त कॅलरी बर्न होतात. कौशांबी येथील यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमित छाबरा म्हणतात, १८ ते ४० वर्षे वयोगटातील लोकांनी आठवड्यातून ५ दिवस४५-६० मिनिटं चालणं हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे.
चालण्यामुळे आरोग्य सुधारेल, मेटाबॉलिझम वेगाने होईल आणि जास्त कॅलरीज बर्न होतील. मात्र, यात चालण्याचा वेगही महत्त्वाची भूमिका बजावतो. जर कोणी वेगाने चालत असेल तर तो जास्त कॅलरीज बर्न करू शकतो आणि जर कोणी हळू चालत असेल तर कमी कॅलरीज बर्न होतील.
४० वर्षांखालील तरुणांनी जलद चालण्यासोबतच अधिक चालण्यावरही भर द्यावा, त्यांनी किमान १० हजार पावलं चालण्याचे उद्दिष्ट ठेवावं. वयाच्या ४० आणि ५० वर्षांदरम्यान, मेटाबॉलिझम मंदावतं. त्यामुळे अशा लोकांनी दररोज ३०-४५ मिनिटं मध्यम वेगाने चाललं पाहिजे.
६० वर्षांवरील वयोगटातील लोकांसाठी दररोज २०-३० मिनिटं चालणं देखील चांगल्या आरोग्यासाठी पुरेसं आहे. तुमचं वय काहीही असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज चाला, संतुलित आहार घ्या आणि प्रोटीन इन्टेक मेंटेन करा असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे.