आजकाल लोकांकडून फिट राहण्यासाठी बरेच प्रयत्न सुरु आहेत (Weight loss). प्रत्येकालाच फिट राहायचं आहे. पण चुकीची पद्धतीची जीवनशैली, योग्य आहार न खाणे, डाएट व एक्सरसाइजकडे लक्ष न देणे, यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढत राहते (Walking). बदलेल्या लाइफस्टाइलमध्ये वेळेअभावी नक्की कोणता व्यायाम जास्त फायदेशीर ठरेल हा प्रश्न समोर पडतो.
जिममध्ये जायला वेळ नाही मिळाल्यास आपण वॉकिंग हा पर्याय निवडतो (Fitness). चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे, जो आपण दिवसभरात कधीही करू शकतो. पण वॉकिंग केल्याने आरोग्यावर कोणते बदल दिसून येतात? उत्तम रिझल्टसाठी नक्की कधी वॉकिंग करावे? जर वेट लॉस करायचं असेल तर, 'या' ४ पद्धतीने वॉकिंग करा. फरक नक्कीच दिसेल(Walking for Weight Loss: How Much to Walk to Lose Weight).
वेट लॉससाठी नक्की कोणत्या पद्धतीने वॉकिंग करावे?
स्पीड वॉकिंग
न्यूयॉर्क स्पेशल सर्जरी हॉस्पिटलचे फिजिकल थेरपिस्ट टेलर मोल्डॉफ सांगतात, 'प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून १५० ते ३०० मिनिटे व्यायाम करायला हवा. दररोज ३० मिनिटे एरोबिक व्यायाम पुरेसे आहे. जर आपण वॉकिंग करीत असाल तर, किमान अर्धा तासात ५ ते १० हजार स्टेप्स पूर्ण करा. यामुळे नक्कीच फरक दिसेल.'
व्यायाम आणि डाएटसाठी वेळच नाही? जिममध्ये न जाता फक्त ५ गोष्टी करा; व्यायामाशिवाय वजन घटेल
इंटरव्हल जॉगिंग
इंटरव्हल जॉगिंग म्हणजे वेगाने चालणे किंवा जॉगिंग करणे. एका मिनिटासाठी सामान्य गतीने चाला, नंतर जलद गतीने चाला किंवा ३० सेकंद धावा. नंतर पुन्हा एक मिनिट सामान्य गतीने चाला. हळूहळू एक मिनिट सामान्य वॉक आणि स्पीड वॉक असे करा. असे केल्याने वेट लॉससाठी मदत होईल.
डोंगराळ भागात चाला
उंचीच्या ठिकाणी चालल्याने किंवा जॉगिंग केल्याने वजन कमी करण्यास मदत होईल. चढावर चालल्याने किंवा जॉगिंग केल्याने कॅलरीज अधिक पटीने बर्न होतील.
२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..
चालण्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग
स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे स्क्वॅट्स, पुश अप्स, वेट लिफ्टिंग इत्यादी व्यायाम. हे व्यायाम केल्याने शरीर फिट आणि सुडौल दिसेल. आपण आठवड्यातून ५ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता.