शरीर फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रोज मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे. सकाळी मॉर्निंग वॉक केल्याने पूर्ण दिवस शरीर एनर्जेटिक राहते आणि अनेक समस्यांपासूनही सुटका होते. पण चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यानं शरीराचे नुकसानही होऊ शकते. मॉर्निंग वॉक केल्याने हाडं आणि हार्ट हेल्दी राहण्यास मदत होते. (Walking for Weight Loss Tips) मॉर्निंग वॉक करण्याची योग्य पद्धत कोणती, मॉर्निंग वॉक रिकाम्या पोटी करावे की काही खाऊन याबाबत समजून घेऊ. (Is it Good to walk in the Morning on an Empty Stomach)
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार रोज सकाळी मॉर्निंग वॉक केल्यानं शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. नियमित मॉर्निग वॉक केल्यानं डायबिटीस, हार्ट आणि ब्लड प्रेशर,सांधेदुखी, कॅन्सर यांसारख्या गंभीर समस्यांचा धोका टळण्यास मदत होते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते आणि मांसपेशींची ताकद वाढते. फिजिशियन डॉ. समीर यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक केल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते. तुम्ही रिकाम्या पोटीसुद्धा वॉक करू शकता.
मॉर्निंग वॉक करताना या गोष्टींची काळजी घ्या (Avoid These mistakes while Walking)
1) मॉर्निंग वॉकला जाण्याआधी कोमट पाणी प्या. ज्यामुळे शरीराला फायदेच फायदे मिळतील. यामुळे शरीर डायड्रेट राहण्यास मदत होईल आणि शरीर दिवसभर एनर्जेटिक राहील. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होईल.
सद्गगुरू सांगतात जेवताना कसं, किती खावं याचे ५ नियम; वजन कंट्रोलमध्ये राहील-आजारही दूर
2) मॉर्निंग वॉकला जाण्याआधी कोणत्याही हेवी,तेलकट पदार्थांचे सेवन करू नका. तुम्ही हलक्या पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
3) सकाळी चालायला जाताना कोणतेही हेवी पदार्थ खाऊ नका. तुम्ही हलका, पौष्टीक नाश्ता करू शकता. दलिया, दही, फळं अशा पदार्थांचे सेवन करा. तुम्ही हलक्या, पौष्टीक नाश्त्याचे सेवन करू शकता. पण जड पदार्थ खाल्ल्यानंतर वॉक करू नका.
पोट सुटलंय, व्यायामासाठी वेळ नाही? रात्री १० नंतर गरम पाण्यात हा पदार्थ मिसळून प्या, झरझर घटेल वजन
4) मॉर्निंग वॉकला जाताना आरामदायक कपडे घाला. वॉक करताना जास्त घट्ट कपडे घातल्यानं रक्तप्रवाह व्यवस्थित होणार नाही. हवेशीर, मोकळ्या ठिकाणी वॉक करा.
५) वजन कमी करण्याासाठी वॉक करत असाल तर फास्ट वॉक करा. हळूहळू तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार रनिंग सुरू करा. यामुळे तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.