Join us  

वजन कमी करण्यासाठी या ५ पद्धतींनी करा चालण्याचा व्यायाम, फरक दिसेल काही दिवसांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2024 9:09 AM

Walking Workout for Weight Loss : How To Use Walking for Weight Lossचालण्याचे अनेक प्रकार आहेत, जे वजन कमी करण्यात मदत करू शकतात, पाहा हे प्रकार नेमके कोणते ?

सध्याचा काळात कोणाला फिट राहायला आवडत नाही. प्रत्येकालाच आपलं वजन नियंत्रणात असायला हवं असं वाटतं. आजकाल बहुतेकजण वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट व एक्सरसाइज वजन कमी करण्यासाठी केले जाते. प्रत्येकाला आपलं वाढलेले वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करायचा असतो, परंतु आपल्या बदलेल्या लाइफस्टाइलमध्ये वेळेअभावी नक्की कोणता व्यायाम जास्त फायदेशीर ठरेल हा प्रश्न समोर पडतो. जास्त तामझाम न करता आणि कोणत्याही वेळी करता येईल असा व्यायाम शोधला जातो. अशा परिस्थितीत 'वॉकिंग' हा सर्वोत्तम एक्सरसाइज मानला जातो. 'वॉकिंग' हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे, जो आपण दिवसभरात कधीही करू शकतो(Easy Walking Plan Can Help You Lose Weight).

वॉकिंग केल्याने आरोग्यामध्ये अनेक सुधारणा होतात. वॉकिंगमुळे आपल्या शारीरिक हालचाली वाढतात, शरीर लवचिक होते, वजन नियंत्रणात राहते आणि स्नायूं मजबूत होण्यास मदत मिळते. चालण्याचे अनेक प्रकार आहेत, जे वजन कमी करण्यात मदत करू शकतात(How To Use Walking for Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी चालण्याचे ५ प्रकार कोणते ? 

१. पॉवर वॉकिंग एक्सरसाइज :- पॉवर वॉकिंग एक्सरसाइज करणे खूप सोपे आहे. पॉवर वॉकिंग एक्सरसाइज करताना तुम्ही तुमचे बॉडी पोश्चर सरळ ठेवावे.  चालताना हात हलकेच मागे - पुढे हलवावेत आणि चालताना आधी टाच जमिनीवर ठेवाव्यात आणि त्याच पद्धतीने चालावे. या प्रकारचा एक्सरसाइज वेगाने केला जातो, म्हणूनच याला पॉवर वॉकिंग एक्सरसाइज म्हणतात. याच्या मदतीने शरीर एनर्जेटिक राहते आणि वजन कमी करण्यासही मदत होते. याशिवाय पॉवर वॉकिंग व्यायामामुळे हृदयाची गती वाढते. हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरते.

२. इंटरवेल वॉकिंग एक्सरसाइज :-  इंटरवेल वॉकिंग एक्सरसाइजमध्ये तुम्ही काही मिनिटे वेगाने चालून मग परत हळुहळु चालू शकता. असा ब्रेक घेत घेत चालण्याच्या या प्रकारामुळे याला इंटरवेल वॉकिंग एक्सरसाइज म्हटले जाते. इंटरवेल वॉकिंग एक्सरसाइज देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या चालण्याच्या व्यायामाने केवळ हाडेच मजबूत होत नाहीत तर सांधेदुखी बरी होते आणि चयापचय क्रियाही सुधारते. इंटरवेल वॉकिंग एक्सरसाइजमुळे कॅलरी जलद बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जे लोक अनेकदा जास्त स्ट्रेसमध्ये असतात त्यांच्यासाठी इंटरवेल वॉकिंग एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे.  

राधिका मर्चण्टची मेकअप आर्टिस्ट सांगतेय योगाचा एक भन्नाट प्रकार, आजार राहतील लांब-मूडही होतो छान..

३. वेट घेऊन वॉकिंग करणे :- सहसा आपण एकाच ठिकाणी उभे राहून किंवा बसून वेट लिफ्टिंग करतो. यामुळे आपला स्टॅमिना आणि ताकद वाढते. परंतु, जेव्हा तुम्ही चालण्यासोबत काही वजन उचलता तेव्हा ते तुमचे आरोग्य सुधारण्यास अधिक मदत होते. वेट घेऊन चालताना तुम्ही डंबेल किंवा कोणतीही जड वस्तू हातात धरु शकता, त्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. 

४. फास्ट वॉकिंग :- फास्ट वॉकिंग म्हणजेच वेगाने चालणे. वेगाने चालण्याचे अनेक फायदे तर आहेत यासोबत वजन कमी करण्यासाठी देखील ते फायदेशीर ठरते. फास्ट वॉकिंग करताना वेगाने चाला मध्ये ब्रेक घेऊ नका. फास्ट वॉकिंग केल्याने तुमची कार्यक्षमता वाढते. यामुळे तुमच्या हृदयाची गती वाढवते, तसेच  श्वसनसंस्थेच्या चांगल्या आरोग्यासाठी फास्ट वॉकिंग उपयुक्त ठरते. यामुळे जलद गतीने कॅलरीज बर्न केल्या जातात. जे लोक त्यांच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी फास्ट वॉकिंग खूप फायदेशीर असते. 

५. वॉकिंग लंजेस :- वॉकिंग लंजेस केल्याने वजन अधिक जलद कमी होण्यास मदत मिळते. वॉकिंग लंजेस करताना चालत असताना मध्येच गुडघा वाकवून अर्धवट खाली बसण्याच्या स्थितीत यावे. वॉकिंग लंजेस केल्याने शरीर टोर्न होते, शारीरिक लवचिकता वाढते आणि वजन संतुलित ठेवण्यास मदत होते.

विराट कोहलीला आवडते तसे ‘प्रोटीन सॅलेड’ करा, वजन राहते नियंत्रणात आणि पचायला हलके-पौष्टिकही 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स