Walking Mistakes : रस्त्यानं चालणाऱ्या लोकांकडे तुम्ही सहजपणे कधी ना कधी पाहत असालच. यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की, प्रत्येक व्यक्तीची चालण्याची एक वेगळी पद्धत असते. कुणी वेगात चालतं तर कुणी हळू, कुणी सरळ चालतं तर कुणी हातं फेकत चालतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, त्यांच्या चालण्याच्या पद्धतीचा त्यांच्या आरोग्याशी संबंध असतो. चालण्याची तुमच पद्धत खूप महत्वाची ठरते. कारण याच पद्धतीनं तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
ब्रिटनचे स्पोर्ट्स सायंटिस्ट आणि वॉकअॅक्टिव डॉट कॉमचे संस्थापक जोआना हॉल यांनी द पोस्टसोबत बोलताना सांगितलं की, 'आपल्या जीवनाचा आधार आधार असलेली बाब जर पूर्ण क्षमतेनुसार केली तर याचा प्रभाव खूप खोलवर होऊ शकतो'. हॉल यांनी चार अशा चुकाही सांगितल्या आहेत ज्या लोक रस्त्यावर चालताना करतात. या चुकांच्या लोकांच्या फिटनेसोबत आरोग्यावरही परिणाम होतो.
चुकीच्या पद्धतीनं का चालतात लोक?
स्नायूंमध्ये असंतुलन
जेव्हा तुम्ही रस्त्यानं चुकीच्या पद्धतीनं चालता, तेव्हा तुम्ही काही मोजक्याच स्नायूंना जास्त सक्रिय ठेवता. तर इतर स्नायूंकडे दुर्लक्ष करता.
चुकीची लाइफस्टाईल
आजकाल जास्तीत जास्त लोक ऑफिसमध्ये काम करताना डेस्कवर जास्त वेळ बसून राहतात. दिवसभर कॉम्प्युटरवर काम करतात. इतकंच नाही तर फोनमध्ये डोकं घालून बसतात. ज्यामुळे स्नायू अखडतात म्हणजे Muscle atophy सारखी समस्या होते. Muscle atrophy ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळे स्नायू पातळ, कमजोरी होतात किंवा आकुंचन पावतात. सगळ्याच वयाच्या लोकांना ही समस्या होऊ शकते.
एखादा आजार किंवा अपघात
योग्य पद्धतीनं न चालण्याचं आणखी एक कारण म्हणजे अपघातही असू शकतं. अपघातात झालेल्या जखमेमुळे आयुष्यभर चालण्यास समस्या होऊ शकते. तसेच एखादी सर्जरी किंवा पायांच्या लांबीतील अंतर हेही कारण असू शकतं. गर्भावस्था देखील तुमच्या चालण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकू शकते.
कोणत्या चुका टाळाल?
चुकीच्या स्नायूंचा वापर
जर तुम्हाला चालताना कधी पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवत असेल तर तुम्ही वॉकदरम्यान शरीराला पुढे नेण्यासाठी चुकीच्या स्नायूंचा वापर करता. जेव्हा तुम्ही तुमच्या हिप फ्लेक्सर्सवर अधिक वाकता, जो कंबरेच्या समोरील स्नायूंचा एक समूह असतो. हिप फ्लेक्सर्स तुमचे पाय किंवा गुडघ्यांना शरीराच्या वरच्या भागात नेण्यास किंवा वाकवण्यात मदत करते. हिप फ्लेक्सर्सवर जास्त दबाव पडल्यानं पावलांची लांबी कमी होते.
चुकीच्या शूजची निवड
जास्तीत जास्त लोक अशा शूज किंवा सॅंडल घालतात जे त्यांच्या पायात योग्यपणे फिट होत नाहीत. ज्यामुळे पाय आणि बोटं चालताना पसरतात. ते एकत्र राहत नाहीत. या कारणानं देखील तुमची चालण्याची पद्धत बदलू शकते. त्यामुळे नेहमी आरामदायक फुटवेअरचा वापर करावा.
डोक्याची पोजीशन
जेव्हा तुम्ही पायी चालत असता तेव्हा यात तुमच्या डोक्याची देखील भूमिका महत्वाची असते. डॉक्टर सांगतात की, बऱ्याचदा लोक चालताना डोकं खाली ठेवतात. हे चुकीचं आहे. यामुळे मान आणि पाठीवर अधिक दबाव पडतो.
हातांकडे दुर्लक्ष
हॉय यांच्यानुसार अनेकदा असं होतं की, तुमचे हात चालताना केवळ खालच्या बाजूनं लटकलेले असतात. हातांची मागे-पुढे हालचाल केली जात नाही. असं केल्यास पूर्ण शरीराची सुद्धा हालचाल होत नाही. खांदे मोकळे होत नाही आणि छातीचे सुद्धा स्नायू मोकळे होत नाहीत.