आजकाल लोकांकडे स्वत:ला देण्यासाठी जराही वेळ नसतो. (Fitness Tips) व्यस्त लाईफस्टाईलमुळे लोक स्वत:कडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. कामाच्या ताण-तणावामुळे लोक रात्रभर काम करत असतात आणि त्यांना सकाळी लवकर जागच येत नही.(Health Tips) जीममध्ये जाऊन वर्कआऊट करणं, योगा या सगळ्यासाठी वेळ नसेल तरीही लोक थोडावेळा सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जातात. (Morning Walk) बरेच लोक मॉर्निंग वॉक करताना काही चुका करतात ज्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा मिळू शकत नाही. योगा एक्सपर्ट्नी मॉर्निंग वॉक करताना कोणत्या चुका करू नये याबाबत सांगितले आहे. (Common Mistake That are Making Your Walk Less Effective)
मॉर्निंग वॉकसाठी सगळ्या योग्य वेळ कोणती? (Right Time For Morning Walk)
एक्सपर्ट्सच्यामते सकाळी जेव्हा सुर्योदय होतो तेव्हा एक ते २ तास तुम्ही मॉर्निंग वॉक करू शकता. हिवाळ्याच्या दिवसांत १० च्या आधी मॉर्निंग वॉक करू शकता. हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही सकाळी ८ च्या सुमारात वॉकिंगसाठी जाऊ शकता. वॉक केल्यानं शरीरातील एनर्दी लेव्हल बूस्ट होण्यास मदत होते. रात्रीच्यावेळी वॉक केल्यानं अन्न लवकर पचण्यास मदत होते. वॉक करताना खाली नमूद केलेल्या चुका टाळल्या तर लवकर वजन कमी होऊ शकेल.
चुकीच्या शूजची निवड
वेब एमडीच्या रिपोर्टनुसार बरेच लोक हाय हिल्स असलेले स्पोर्ट्स शूज घालून चालायला जाताना घालतात. तर काहींचे शूज फार घट्ट असतात. यामुळे चालताना त्रास होतो, गुडघेदुखी, टाचा दुखणं अशा समस्या उद्भवू शकतात. वेदना अधिक वाढल्यास तुम्ही चालण्याची सवय कंटीन्यू ठेवू शकणार नाही म्हणूनच पायाला आरामदायक वाटतील अशा शूजची निवड करा.
वॉक करताना फोन पाहत चालणं
वॉक करताना तुमच्या फोनकडे टक लावून पाहा. यामुळे दुखापत होऊ शकते. मॉर्निंग वॉक करताना ६० टक्के दुर्घटना या फोनच्या वापरामुळे उद्भवतात. चालण्याच्या वेगाकडे लक्ष द्यायचं असेल तर वॉक करताना फोनचा वापर टाळा.
कोण म्हणतं भात-चपाती खाल्ल्याने वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर जेवून बारीक होण्याचं सिक्रेट
मास्कचा वापर
हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाताना मास्कचा वापर करायला हवा. यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो. मास्कचा वापर केल्यानं संक्रमणाचा धोका टाळता येईल. पण तुम्ही मोकळ्या हवेत असाल आणि त्या ठिकाणी जास्त लोक वॉक करत नसतील तर तुम्ही मास्क काढून वावरू शकता.
चालताना ब्रेक न घेणं
व्यायाम आणि सायकलिंग करताना जसा ब्रेक हवा असतो तसंच वॉकिंगसाठीही गरजेचा असतो. संशोधक सांगतात की तुम्ही चालताना ब्रेक घेतला तर फिटनेस लेव्हल वाढू शकते आणि वेगाने फॅट लॉस होण्यासही मदत होईल. १५ मिनिटं चालल्यानंतर ३० सेकंदाचा किंवा एका मिनिटाचा ब्रेक घ्या.
खोकला-सर्दी सतत असते; रामदेव बाबा सांगतात ६ उपाय, छातीतला कफ पातळ होईल पटकन
वॉर्मअप करणं महत्वाचे
वॉर्मअप केल्याशिवाय चालायला जाणं फार चुकीचे आहे. ही एक मोठी चूक आहे. वॉर्मअप हा एक व्यायाम आहे. ज्याला तुम्ही हलक्या फुलक्या स्टेप्सचा व्यायामही म्हणू शकता. वॉर्मअप व्यायाम केल्याने शरीराची क्षमता वाढते आणि इंज्यूरीज होण्याची शक्यताही कमी होते. म्हणून न विसरता वॉर्मअप करा.