Lokmat Sakhi >Fitness > धावणं की चालणं, पटापट वजन कमी करण्यासाठी काय उत्तम? स्लिम-फिट दिसण्याचा सोपा फंडा...

धावणं की चालणं, पटापट वजन कमी करण्यासाठी काय उत्तम? स्लिम-फिट दिसण्याचा सोपा फंडा...

Walking or running which is best exercise : रनिंग आणि वॉकिंग दोन्ही कार्डिओ व्यायाम आहेत. यामुळे गंभीर आजारांचा धोका टळतो. संशोधनानुसार कार्डिओ एक्सरसाईज डिमेंशिया, ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल कमी होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 04:06 PM2023-06-23T16:06:41+5:302023-06-23T18:09:31+5:30

Walking or running which is best exercise : रनिंग आणि वॉकिंग दोन्ही कार्डिओ व्यायाम आहेत. यामुळे गंभीर आजारांचा धोका टळतो. संशोधनानुसार कार्डिओ एक्सरसाईज डिमेंशिया, ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल कमी होते.

Walking or running which is best exercise for weigh loss expert explain running in outdoor benefits | धावणं की चालणं, पटापट वजन कमी करण्यासाठी काय उत्तम? स्लिम-फिट दिसण्याचा सोपा फंडा...

धावणं की चालणं, पटापट वजन कमी करण्यासाठी काय उत्तम? स्लिम-फिट दिसण्याचा सोपा फंडा...

आधीच्या काळात लोक खूप चालायचे. फिजिकल एक्टिव्हीटीज पूर्ण करण्यासाठी वेगळं चालण्याची गरज नव्हती. चालल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Walking or running which is best exercise) चालणं हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे ज्यामुळे हृदयाचे आजार, डायबिटीसचा धोका कमी होतो. पायी चालल्यानं  स्ट्रोक, हाय ब्लडप्रेशर, कॅन्सर आणि टाईप २ डायबिटीसचा (Diabetes) धोका कमी होतो. (Walking or running which is best exercise for weigh loss expert explain running in outdoor benefits)

अतिवेगानं चालल्यास त्याचे धावण्यात रूपांतर होते. धावताना हृदयाचे ठोके वेगानं होतात आणि कमी वेळात जास्त शारीरिक हालचाली होतात. चालल्यानं की धावल्यानं वजन पटकन कमी होतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असता तेव्हा हे समजून घेणं गरजेचं आहे. (Which is best exercise for weigh loss expert)

महिन्याभरात झरझर घटेल वजन; तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा अस्सल उपाय, दिसाल स्लिम

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार रनिंग आणि वॉकिंग दोन्ही कार्डिओ व्यायाम आहेत. यामुळे गंभीर आजारांचा धोका टळतो.  संशोधनानुसार कार्डिओ एक्सरसाईज डिमेंशिया, ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल कमी होते. याशिवाय स्मरणशक्तीचांगली राहते. याशिवाय  रक्तप्रवाही व्यवस्थित राहतो. कार्डिओ व्यायामानं मूड चांगला राहतो आणि इरेक्टाईल फंक्शनही चांगले राहते. वॉकिंग कोणीही करू शकतो पण धावणं पावरफूल आहे.

यात स्टॅमिना आणि ताकद जास्त लागते. २ मिनिटांचे धावणे ४ मिनिटांच्या चालण्याप्रमाणे असते. हेल्दी लाईफस्टाईलसाठी  एक्सपर्ट्स आठवड्यात १५० मिनिटं मॉडरेट व्यायाम करण्याचा सल्ला देतात किंवा ७५ मिनिटटं वेगानं व्यायाम करण्याचा सल्ला देतात. यामुळे स्नायूंची ताकद वाढते.

धावणं उत्तम की चालणं?

जर तुम्ही पहिल्यांदाच किंवा खूप दिवसांनी व्यायाम सुरू करत असाल तर चालण्याकडे लक्ष केंद्रीत करा. ३ ते साडे तीन किलोमीटर प्रति तासांचा वेग असेल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. संशोधनात दिसून आलं की, वेगानं चालणाऱ्यांमध्ये  हार्टच्या आजारांचा धोका ३१ टक्क्यांनी कमी असतो. जेव्हा तुम्ही चालण्याचा वेग पकडाल तेव्हा रनिंग करू शकता. रनिंगमध्ये चालण्याच्या तुलनेत दुप्पट कॅलरीज कमी होतात.

पोट, कंबरेची चरबी फारच सुटली? रामदेव बाबांचे खास उपाय; स्लिम पोट-दिसेल मेंटेन फिगर

जर एखाद्या व्यक्तीचं वजन ७२ किलो असेल तर  ५ ते ६ किलोमीटर वेगानं चालत असेल तर अर्ध्या तासात १५६ कॅलरीज बर्न होतील. व्यक्ती ताशी 10 ते 12 किलोमीटर वेगाने धावली तर अर्ध्या तासात 356 कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी धावणे चांगले आहे परंतु प्रत्येकासाठी ते योग्य नाही. यासाठी निरोगी राहणे अधिक महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर नियमित चालण्याचा सराव आवश्यक आहे कारण धावण्याचा सरावही खूप महत्त्वाचा आहे.

धावणाऱ्यांनाही ऑस्टियोआर्थराइटिसचा त्रास होऊ शकतो. हाडांच्या मध्यभागी  असलेला भाग तुटल्यावर ऑस्टियोआर्थरायटिस होतो. यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. तथापि, संशोधनात असेही दिसून आले आहे की ऑस्टियोआर्थरायटिस असताना धावताना दुखापत होण्याची भीती जास्त असते.

व्हिटामिन B-12 कमी आहे? न चुकता खा ७ पदार्थ; थकवाही कमी होईल आणि डेफिशियन्सीही!

चालण्याने हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादींचा धोका धावण्याइतकाच कमी होतो, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. चालण्यात धोका नसून चालणे खूप फायदेशीर असते, धावताना फ्रॅक्चर होण्याची भीती असते.

Web Title: Walking or running which is best exercise for weigh loss expert explain running in outdoor benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.