Join us  

ट्रेडमिलवर चालावे की बाहेर मॉर्निंग वॉक ? फिट राहण्यासाठी नेमकं काय आहे फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 10:31 PM

Is Walking on a Treadmill or Outside a Better Workout? : 'चालणं' हा एक उत्तम एक्सरसाइज आहे. पण धावायचं कसं आणि कुठे हा प्रश्न असतोच, बाहेर की ट्रेडमिलवर चालणं चांगलं ?

आजकाल प्रत्येकजण आपल्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरुक असतात. बदलती लाईफस्टाईल व बिझी शेड्युलमुळे बऱ्याचजणांना एक्सरसाइजसाठी पाहिजे तसा वेळ मिळत नाही. असे असले तरीही दिवसभरात काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी (Is It Better to Run on a Treadmill or Outside?) करावी म्हणून अनेकजण चालण्याचा पर्याय निवडतात. बेसिक चालणे हा तसा शरीरासाठी उत्तम व्यायाम मनाला जातो. फिट राहण्यासाठी दिवसभरात अ‍ॅक्टिव्हिटी करता आली नाही म्हणून किमान १ तास तरी चालण्याचा व्यायाम करावा, असे मानले जाते. चालण्याने आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोच, परंतु हे चालणे ट्रेडमिलवर असावे की बाहेर मोकळ्या हवेत ? असा प्रश्न अनेकांना पडतो(Is it better to walk outside or on a treadmill?).

काहीजणांना जिममधील ट्रेडमिलवर चालणे पसंत असते, (Walking Outside vs. Walking on a Treadmill: Which Is Best for Your Health?) तर काहींना बाहेर मोकळ्या हवेत चालणे आवडते. पण काहीवेळा आपल्याला प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी ट्रेडमिलवर चालावे की बाहेर उघड्या मैदानात (Walking Outside vs. Walking on a Treadmill: Which Is Best for Your Health?) मॉर्निंग वॉक करावे. धावण्याचा किंवा चालण्याचा एक्सरसाइज करण्यासाठी नेमकं काय फायदेशीर ठरु शकत. चालण्याचा हा एक्सरसाइज नेमका कुठे करणे अधिक चांगले आहे. या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळावे यासाठी काही खास टिप्स(Treadmill vs Walking Outside: What Is Better for You?)   

काय बेस्ट... मॉर्निंग वॉक की ट्रेडमिल वॉक ?

१. ट्रेडमिलवर धावण्यापेक्षा खुल्या हवेत धावणे अधिक चांगले. कारण बाहेरची फ्रेश हवा जेव्हा तुम्हाला मिळते, तेव्हा तुम्ही अधिक उत्साही आणि तजेलदार होता. पण बऱ्याचदा बाहेर धावायला जाणे, हेच अनेकांसाठी कंटाळवाणे असते. कारण बाहेर जायचे म्हणजे चांगली ड्रेसिंग हवी, धावण्याचा मार्ग कमीतकमी प्रदुषण असणारा हवा, बाहेर धावायला जायचे म्हणजे ज्या वेळी वाहने जास्त नसतील, अशा वेळा निवडाव्या लागतात. अशा वेळा मिळणं आणि शहरात असे रस्ते मिळणं, एकंदरीतच आता अवघड झालं आहे. त्यामुळे अशी सगळी कारणं जर तुम्हाला खुल्या हवेत धावण्यापासून रोखत असतील, तर सरळ मनातले सगळे विचार थांबवा आणि अगदी बिनधास्तपणे ट्रेडमिलवर धावणे सुरू करा.  

२. ट्रेडमिल आणि खुले मैदान असे कुठेही तुम्ही धावलात, तरी तुम्ही तुम्हाला हवे ते ध्येय गाठू शकता. खुल्या मैदानात धावणे हे तुम्हाला किती थकवणारे आहे, हे बाहेरच्या वातावरणावर अवलंबून असते. जर उन्हाळ्याचे दिवस असतील, तर कमी अंतर गाठूनही तुम्हाला थकवा येतो, जो पावसाळी हवेत जाणवत नाही. असा प्रश्न ट्रेडमिलच्या बाबतीत जाणवत नाही. ही ट्रेडमिलची एक सकारात्मक बाजू असली तरी त्याची दुसरी बाजू म्हणजे मग बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेत धावण्याचा सराव तुमच्या शरीराला राहत नाही.

तुम्हाला पण वर्कआऊट पूर्वी चहा पिण्याची सवय आहे का ? चहाची तलफ लागलीच तर चहाला उत्तम पर्याय...

३. ट्रेडमिलवर चालताना हवेचा दाब समोरून येत नसल्याने धावण्याची ही पद्धत थोडी सोपी वाटते. याउलट बाहेर मैदानात धावताना समोरून हवेचा दाब येत असतो, त्यामुळे धावणे कठीण होते. यासाठीच ट्रेडमिलवर चालताना तुमच्‍या ट्रेडमिलला किंचित वर करा, जेणेकरून आपल्याला चढण चढल्यासारखे वाटेल.  ज्यामुळे चालताना आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतातन पण आपले हृदय मजबूत होते.

४. जे लोक घराबाहेर एका विशिष्ट वेगाने धावतात ते ट्रेडमिलवर त्याच वेगाने धावणाऱ्यांपेक्षा ५ % जास्त कॅलरीज बर्न करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घराबाहेर धावणे अधिक योग्य मानले जाते.

दिवसभरात १०,००० पाऊले चालले म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोकाच नाही, तज्ज्ञ सांगतात असं तुम्हाला वाटत असेल तर...

५. खुल्या मैदानात धावताना समाेरचा रस्ता प्रत्येकवेळी सारखा नसतो. त्यामुळे तोल सांभाळत धावणे हे खुल्या मैदानात धावूनच आपण शिकत जातो. पण  खुल्या मैदानात धावताना कधी खड्डे, कधी चांगला रस्ता तर कधी आणखी काही, यामुळे तोल जाऊन दुखापत होण्याचीही शक्यता असते. ट्रेडमिलचे शॉकअप्स खूप चांगले असतात, त्यामुळे ट्रेडमिलवर धावल्याने गुडघेदुखी, घोटेदुखीचे प्रमाण कमी असते. हा त्रास खुल्या हवेत धावणाऱ्यांना जाणवू शकतो. 

कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...

दोन्हीही प्रकारचे धावणे आरोग्यासाठी चांगलेच आहे. प्रत्येकाचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. त्यामुळे आपल्यासाठी नेमके काय चांगले आहे, आपल्याला कशाची गरज आहे हे ओळखावे आणि त्यानुसार एक्सरसाइजसाठी पर्याय निवडावा. यासोबतच शेवटी काय अधिक फायदेशीर आहे हे ठरवणे  पूर्णपणे आपल्या शरीराच्या गरजा, तुमच्याकडे असलेला वेळ आणि धावण्याच्या जागेची सोय यावर अवलंबून असते. या दोन्ही पद्धतींपैकी एकही हानिकारक नाही. दोघांचेही स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे.

टॅग्स :फिटनेस टिप्स