Join us  

वजन कमी करण्यासाठी रोज चालायला जाताय? त्यासोबत ही १ गोष्ट केली तरच होईल उपयोग, वजन कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 8:10 AM

Regular Walking Is Effective For Weight Loss?: वजन कमी करण्यासाठी नुसतं वॉकिंग (walking) करत असाल, तर तर त्याचा फार काही उपयोग होणार नाही. म्हणूनच वॉकिंगसोबत आणखी काय करावं, यासाठी वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला.

ठळक मुद्दे फिट राहण्यासाठी शरीराला स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्ट्रेचिंग, स्टॅबिलिटी या चारही गोष्टींची आवश्यकता असते. फक्त वॉकिंगमुळे त्या मिळू शकत नाहीत.

सकाळी- सकाळी मैदानावर आपण अनेक लोक पाहतो, जे वॉकिंग करण्यासाठी आलेले असतात. साधारणपणे वॉकिंगसाठी (walking) आलेले लोक मध्यमवयीन असतात. तसंच त्यांचं फिरण्याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे वजन कमी करणं (weight loss) हे असतं. पण वजन कमी करण्यासाठी फक्त वॉकिंगच करत असाल, तर त्याने फारसा उपयोग होणार नाही. चालण्याच्या माध्यमातून शरीराची हालचाल होणे, योग्यच आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. पण वजन कमी करण्याच्या उद्देशाने मात्र फक्त वॉकिंग करत असाल, तर ते तेवढे उपयोगी ठरणार नाही, असे सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी सांगितले.

 

ऋजुता यांनी एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामला शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी वॉकिंग करण्याचे फायदे तर सांगितले आहेत. तसेच वजन कमी करण्याच्या उद्देशाने वॉकिंग करत असाल, तर त्या जोडीला आणखी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि का बरं, याविषयी देखील सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे आता इथून पुढे जर वजन कमी करण्याच्या  उद्देशाने वॉकिंग करणार असाल, तर या काही गोष्टी लक्षात घ्या.

 

वॉकिंग करण्याचे फायदे१. वॉकिंग केल्यामुळे सगळ्या शरीराची हालचाल होते. त्यामुळे रक्तप्रवाह वाढण्यास आणि तो सुरळीत होण्यास मदत होते. २. नियमित चालण्याच्या सवयीमुळे पचनक्रिया चांगली होते.३. गॅसेसचा त्रास होत असल्यास तो नियमित चालण्यामुळे कमी होतो.४. अनिद्रेचा त्रास कमी करण्यासाठीही चालण्याचा व्यायाम फायदेशीर ठरतो.५. मुड चांगला राहण्यासाठी, मन फ्रेश होण्यासाठी तसेच मुड स्विंग्सचा त्रास टाळण्यासाठीही चालण्याचा व्यायाम करावा.

 

वॉकिंगचा जास्तीतजास्त उपयोग होण्यासाठी- वॉकिंग करून वजन कमी करायचे असल्यास आणि वॉकिंग करण्याचा पुरेपूर फायदा शरीराला मिळवून द्यायचा असल्यास  त्याच्या जोडीला योगा किंवा जीम एक्सरसाईज अवश्य केले पाहिजे. - कारण फिट राहण्यासाठी शरीराला स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्ट्रेचिंग, स्टॅबिलिटी या चारही गोष्टींची आवश्यकता असते. त्या गोष्टी जीममधला व्यायाम किंवा योगातून मिळतात. फक्त वॉकिंगमुळे मिळू शकत नाहीत. त्यामुळे वॉकिंगच्या जोडीला जीम किंवा योगा करण्याचा सल्ला ऋजुता यांनी दिला. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स