Join us

हळूहळू की भरभर, कोणत्या स्पीडनं चालल्यास रहाल जास्त फिट? जाणून घ्या योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:28 IST

Walking Speed : तुमच्या चालण्याच्या स्पीडनंही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही कळून येतं. पायी चालणं ही एक परीपूर्ण एक्सरसाईज समजली जाते.

Walking Speed : शरीराचं आरोग्य आणि वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी डॉक्टर अनेक गोष्टी बघतात. चेकअप करून शरीराचं तापमान, पल्स रेट, रेस्पिरेशन रेट, ब्लड प्रेशर आणि ऑक्सीजन सॅचुरेशन जाणून घेतलं जातं. यातील कशातही गडबड झाल्यास शरीरात काय समस्येची माहिती जाणून घेता येते.

इतकंच काय तर तुमच्या चालण्याच्या स्पीडनंही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही कळून येतं. पायी चालणं ही एक परीपूर्ण एक्सरसाईज समजली जाते. पायी चालून हृदय निरोगी राहतं, वजन कंट्रोल होतं आणि डायबिटीसचा धोकाही कमी होतो. हेल्दी लाइफस्टाईलसाठी रोज पायी चालणं फार गरजेचं आहे.

पायी चालण्याच्या स्पीडवर हे जाणून घेता येतं की, कुणाचं शरीर हेल्दी आहे आणि कुणाचं नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पायी चालण्याच्या स्पीडवरून मेंदुच्या काम करण्याच्या क्षमतेबाबतही जाणून घेता येतं.

मनुष्याच्या चालण्याचा स्पीड

एक रिसर्चनुसार, चालण्याचा स्पीड लिंग आणि तुमच्या वयावर अवलंबून असतो. सरासरी ३० वयापेक्षा कमी वयाचे लोक ४.८२ किलोमीटर प्रति तास, ३० ते ४९ वयोगटातील लोक ४.५४ किलोमीटर प्रति तास आणि ५० ते ५९ वयोगटातील लोक ४.४३ किलोमीटर प्रति तास वेगानं चालतात.

स्पीडनं चालणारे जास्त हेल्दी

Yahoo Life च्या एका रिपोर्टनुसार Dr. Anthony Giuffrida यांनी सांगितलं की, स्पीडनं चालण्यातून हे दिसून येतं की, मसल्समध्ये ताकद आहे, कॉर्डिनेशन आणि न्यूरोमस्कुलर फंक्शनही योग्य आहे. हे हेल्दी हार्ट आणि फुप्फुसाचा संकेत आहे.

हळू चालणाऱ्यांना धोका

हळू चालल्यानं आरोग्यासंबंधी काही समस्या होऊ शकतात. ज्यात आर्थराइटिस, हार्ट डिजीज, क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज यांचा समावेश आहे.

स्पीडनं चालून वाढेल मेंदुची क्षमता

एका रिसर्चनुसार, स्पीडनं चालणं आणि कॉग्निटिव फंक्शनमध्ये संबंध असतो. अनेक टेस्ट केल्यानंतर समजलं की, ज्या लोकांच्या मेंदुचं फंक्शन बिघडलेलं असतं, त्यांचा चालण्याची स्पीड कमी आढळली.

चालणं गरजेचं का?

पायी चालणं हे काही काम नाही हा एक व्यायाम आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रीवेंशननुसार, दर आठवड्यात कमीत कमी १५० मिनिटं मॉडरेट इंटेंसिटी एरोबिक अ‍ॅक्टिविटी करावी. ज्यात स्पीडनं चालण्याचाही समावेश आहे. असं केल्यास हृदय, फुप्फुसं, मांसपेशी आणि शरीरातील इतर अवयव मजबूत होतात.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स