Lokmat Sakhi >Fitness > दीपिकासारखा सुंदर निमुळता चेहरा, उंच सुबक मान हवी? परफेक्ट जाॅ लाइनसाठी करा 4 व्यायाम 

दीपिकासारखा सुंदर निमुळता चेहरा, उंच सुबक मान हवी? परफेक्ट जाॅ लाइनसाठी करा 4 व्यायाम 

चेहरा , मान जाड दिसल्याने चेहऱ्याचा लूक बिघडतो. ह लूक सुधारायचा असेल तर दीपिकासारखी जाॅ लाइन हवी. ती विशिष्ट व्यायाम प्रकारांनी सहज शक्य आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 06:43 PM2022-02-16T18:43:04+5:302022-02-16T18:54:25+5:30

चेहरा , मान जाड दिसल्याने चेहऱ्याचा लूक बिघडतो. ह लूक सुधारायचा असेल तर दीपिकासारखी जाॅ लाइन हवी. ती विशिष्ट व्यायाम प्रकारांनी सहज शक्य आहे!

Want a beautiful, perfect jaw line like Deepika? Do 4 Exercises for the Perfect Jaw Line | दीपिकासारखा सुंदर निमुळता चेहरा, उंच सुबक मान हवी? परफेक्ट जाॅ लाइनसाठी करा 4 व्यायाम 

दीपिकासारखा सुंदर निमुळता चेहरा, उंच सुबक मान हवी? परफेक्ट जाॅ लाइनसाठी करा 4 व्यायाम 

Highlightsपररफेक्ट जाॅलाइनसाठी चेहरा, मान आणि हनुवटी यांचा व्यायाम करणं आवश्यक आहे. ओ आणि ई अक्षरं उच्चारुन ,चेहऱ्यावर बोटांच्या सहाय्याने मसाज करुन चेहऱ्याच्या स्नायुंचा व्यायाम करता येतो. 

फिटनेसमुळे सौंदर्य वाढतं यात काही शंका नाही. केवळ फिगरच नाही तर चेहराही निमुळता दिसण्यासाठी , मान उंच सुबक दिसण्यासाठी फिटनेसची मदत होते. फिटनेससाठी व्यायाम हवा. चेहरा सुंदर दिसण्याचा आणि व्यायामाचा काय संबंध? असा प्रश्न पडला असेल तर दीपिका पदुकोणचा चेहरा समोर आणावा. दीपिकाचा चेहरा हा जन्मजात निमुळता असला , तिची मान मुळातच सुबक असली तरी आपल्यालाही दीपिकासारखा चेहरा सुंदर करण्याचा पर्याय आहेच. त्यासाठी कोणती सर्जरी किंवा ब्यूटी टूलचा वापर करण्याची गरज नाही. परफेक्ट जाॅ लाइनसाठी चेहऱ्याचा व्यायाम महत्त्वाचा आहे.

Image: Google

परफेक्ट जाॅ लाइनसाठी चेहऱ्याचे काही व्यायाम प्रकार आहेत. ते नियमित केल्यास चेहरा आणि मानेवरील चरबी कमी होते. वयानुसार मानेकडची त्वचा सैल पडून चेहरा आणि मानेतलं अंतर कमी दिसतं . यामुळे चेहरा, मान जाड दिसते. हा लूक टाळण्यासाठी म्हणूनच दीपिकाचा चेहरा डोळ्यासमोर आणून जाॅ लाइन परफेक्ट होण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. फिटनेस तज्ज्ञ सोनिया बक्षी यांनी चेहऱ्याची आणि मानेची चरबी घटवण्यासाठीचे सोपे व्यायाम प्रकार सांगितले आहेत, ते कोणालाही कुठेही बसून सहज करता येण्यासारखे आहेत. 
निमुळता चेहरा आणि उंच सुबक मानेसाठी

 

Image: Google

1. मान वर खाली

परफेक्ट जाॅ लाइनसाठी मानेचा व्यायाम करणं गरजेचं असतं. मानेचा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर मांडी घालून ताठ बसावं. श्वास घेत मान वर उचलून छताकडे पाहावं. अर्ध्या मिनिटानंतर मान खाली आणून नजर समोरच्या दिशेने स्थिर करावी. या व्यायामाचे 3 सेट करावेत. प्रत्येक सेटमध्ये 15 वेळा मान वर करुन खाली आणून समोर नजर स्थिर ठेवावी.  या व्यायामानं मानेचे स्नायू ताणले जातात. मानेवरची चरबी घटवण्यासाठी हा व्यायाम उत्तम मानला जातो. 

Image: Google

2.  ओ-ईचं उच्चारण

हा व्यायाम प्रकार करताना भिंतीला किंवा खुर्चीला पाठ टेकवून ताठ बसावं. तोंडाचा चंबू करुन ओ अक्षर उच्चारावं. नंतर काही सेकंद थांबून मग ई हे अक्षर उच्चारावं. प्रत्येक अक्षर 20 वेळा उच्चारावं. 20 उच्चारणां एक सेट याप्रमाणे प्रत्येक अक्षराचे 3 सेट करावेत.

Image: Google

3. हनुवटी पुढे मागे

चेहरा आकर्षक दिसण्यासाठी हनुवटी टोकदार असावा लागते. हुनवटी टोकदार करण्यासाठी  विशेष व्यायाम आहे. हनुवटीचा व्यायाम  करताना ओठ मिटलेले हवेत. मग खालचा ओठ वर उचलून हनुवटी पुढे करावी.  ओठ खाली आणून हनुवटी मूळ स्थितीत आणावी. . असं 15 वेळा करावं. 15चा एक सेट याप्रमाणे 3 सेटमध्ये हनुवटीचा व्यायाम करावा.

Image: Google

 

4. हनुवटी छातीस टेकवणे

हनुवटी छातीस टेकवण्याचा व्यायाम प्रकार करण्यासाठी पाठीवर झोपावं. हनुवटी छातीस टेकवून डोकं जमिनीपासून थोडं वर उचलावं. 10 चा एक सेट याप्रमाणे या व्यायामाचे 3 सेट करावेत. 

Image: Google

या 4 व्यायाम प्रकारांसोबतच बोटं गालावर गोलाकार फिरवून किमान 5 मिनिटं चेहऱ्याचा मसाज करावा. बदामाचं तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करुन चेहऱ्यावर बोटांनी मसाज केल्यास चांगला फायदा होतो. 

Web Title: Want a beautiful, perfect jaw line like Deepika? Do 4 Exercises for the Perfect Jaw Line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.