बॉलीवूडच्या नव्या फळीतील फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूरकडे पाहिलं जातं. पिलेट्स या वर्कआऊट (Pilates workout) प्रकाराविषयीचं तिचं प्रेम तर जगजाहीर आहे. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा ती पिलेट्स प्रकारात जास्त रमते. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली जान्हवी तिचा फिटनेस मेंटेन करत असून तिने तिचा एक वर्कआऊट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (instagram share) नुकताच शेअर केला आहे. यामध्ये पिलेट्स Pilates workout प्रकारातला एक अवघड प्रकार जान्हवी करत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना जान्हवीने कॅप्शन दिली आहे की, कधीकधी गाढ झोपेत असताना स्वप्नातही मला नम्रता “go slow” असं म्हणते आहे हे ऐकू येतं....
जान्हवीप्रमाणे छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री हिना खानही नुकतीच पिलेट्स वर्कआऊट करताना दिसून आली. हे वर्कआऊट करताना हिना कमालीची घामाघूम झाली होती. त्यावरूनच पिलेट्स वर्कआऊटचा हा प्रकार करायला किती अवघड असावा, याच अंदाज येत होता. छोट्या पोल्सच्या आधारे शरीराचे संतूलन सांभाळून पाय मागे- पुढे करणे अशाप्रकारचा व्यायाम हिना करताना दिसत आहे. हा अवघड व्यायाम प्रकार अतिशय सहजतेने करणे, ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे, असं हिनाने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
पिलेट्स वर्कआऊट करण्याचे फायदे (Benefits of Pilates workout)- शरीर लवचिक होते.- स्नायुंची ताकद वाढविण्यासाठी उपयुक्त व्यायाम.- पाठीचा कणा, पोट, कंबर, मांड्या, दंड असा संपूर्ण व्यायाम या वर्कआऊटमधून मिळतो. - शरीराचं बॅलेन्सिंग सांभाळण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे.- मानसिक ताण कमी करण्यासाठी Pilates workout फायद्याचे ठरते.- फुफुसाची ताकद वाढते.