Lokmat Sakhi >Fitness > जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

Want fitness and figure like Janhvi Kapoor? Mix 1 golden thing in coffee and drink daily; The brain will also get a boost : पोषणतज्ज्ञ सांगतात कॉफीमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून प्यायल्याने शरीराला जबरदस्त फायदे मिळतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2024 03:16 PM2024-09-11T15:16:56+5:302024-09-11T15:26:15+5:30

Want fitness and figure like Janhvi Kapoor? Mix 1 golden thing in coffee and drink daily; The brain will also get a boost : पोषणतज्ज्ञ सांगतात कॉफीमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून प्यायल्याने शरीराला जबरदस्त फायदे मिळतात..

Want fitness and figure like Janhvi Kapoor? Mix 1 golden thing in coffee and drink daily; The brain will also get a boost | जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आपल्या फिटनेसाठी ओळखली जाते (Fitness). जान्हवी व्यायाम आणि डाएट काटेकोरपणे फॉलो करते. तिच्या डाएटमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. यासह ती दररोज उठल्यानंतर सकाळी कॉफी पिते. आपल्यापैकी अनेकांना कॉफी प्यायला आवडते (Health Tips). कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चयापचय सुधारते आणि मानसिक आरोग्यही सुधारते.

जर आपल्याला मेंदू योग्यरित्या कार्य करावे असे वाटत असेल तर, कॉफीमध्ये तूप घालून प्या. कॉफी आणि तूप या सुपर हेल्दी कॉम्बिनेशनचे अनेक फायदे आहेत. फक्त जान्हवी कपूर नसून, अनेक कलाकार कॉफीमध्ये तूप घालून पितात. कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचे फायदे किती? याची माहिती पोषणतज्ज्ञ डॉक्टर शिल्पा अरोरा यांनी दिली आहे(Want fitness and figure like Janhvi Kapoor? Mix 1 golden thing in coffee and drink daily; The brain will also get a boost).

मेंदूला चालना मिळते

कॉफीमध्ये तूप घालून प्यायल्याने मेंदूला चालना मिळते. यासह रोगप्रतिकारशक्तीही वाढते. पोषणतज्ज्ञ सांगतात, आपले मेंदू हे ६० टक्के फॅटपासून बनलेला आहे. तर, तुपात ओमेगा ३ असते, जे मेंदूला सक्रिय करते. कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असते, ज्यामुळे शरीरात त्वरित ऊर्जा निर्माण होते. जेव्हा आपण कॉफीमध्ये तूप घालतो, तेव्हा ब्रेन टिश्यूला पोषण मिळते.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

मानसिक आरोग्य सुधारते

कॉफीमध्ये कॅफीन असते. तर, तुपामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न असते. जर आपल्याला मानसिक शांती आणि सुदृढ शरीर हवं असेल तर, कॉफीमध्ये तूप घालून प्या. यामुळे स्ट्रेस कमी होऊ शकते. शिवाय मेंदू फ्रेश आणि स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी हे पेय मदत करते.


मुरमुऱ्याचा मेदूवडा कधी करून पाहिलं का? १५ मिनिटांत करा झटपट पौष्टिक ब्रेकफास्ट

शरीराला सक्रिय ठेवते

कॉफीमध्ये तूप घालून प्यायल्याने फक्त मेंदू सक्रिय राहत नाही, तर शरीरालाही असंख्य फायदे मिळतात. जेव्हा तुपातील फॅट कॉफीमध्ये असलेल्या मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स (एमसीटी) सोबत एकत्रित होते, तेव्हा ते शरीराला दिवसभर सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा देतात. 

Web Title: Want fitness and figure like Janhvi Kapoor? Mix 1 golden thing in coffee and drink daily; The brain will also get a boost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.