Lokmat Sakhi >Fitness > करा आलिया भटच्या आवडीचं वीरभद्रासन, आसन एक फायदे अनेक; चरबी वितळून वाढेल लवचिकता

करा आलिया भटच्या आवडीचं वीरभद्रासन, आसन एक फायदे अनेक; चरबी वितळून वाढेल लवचिकता

Fitness Tips: शरीरावरचे अतिरिक्त फॅट्स बर्न (fats burn) करून स्लिम ट्रिम व्हायचंय, मग आलिया भटसारखे वीरभद्रासन (weight loss tips) करा.. बघा हे आसन कसं करायचं आणि त्याचे इतर फायदे कोणते.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 05:13 PM2022-03-17T17:13:37+5:302022-03-17T17:15:27+5:30

Fitness Tips: शरीरावरचे अतिरिक्त फॅट्स बर्न (fats burn) करून स्लिम ट्रिम व्हायचंय, मग आलिया भटसारखे वीरभद्रासन (weight loss tips) करा.. बघा हे आसन कसं करायचं आणि त्याचे इतर फायदे कोणते.. 

Want to burn extra fats? try this yogasana like Alia Bhatt, Read the benefits of Veerbhadrasana | करा आलिया भटच्या आवडीचं वीरभद्रासन, आसन एक फायदे अनेक; चरबी वितळून वाढेल लवचिकता

करा आलिया भटच्या आवडीचं वीरभद्रासन, आसन एक फायदे अनेक; चरबी वितळून वाढेल लवचिकता

Highlights शरीर सुडौल होऊन शरीराला योग्य आकार मिळण्यासाठी वीरभद्रासन करावे.हात, कंबर, मांड्या आणि पोटऱ्या येथील स्नायूंचा व्यायाम होण्यासाठी वीरभद्रासन उपयुक्त ठरते.

आलिया भट तिच्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरुक असते... त्यामुळेच तर सोशल मिडियावरूनही ती तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच फिटनेस टिप्स (Fitness tips by Alia) शेअर करत असते. आलियाने तिचा वाढदिवस नुकताच दणक्यात साजरा केला. तिला सोशल मिडियावरून अनेक जणांनी शुभेच्छाही दिल्या. तिची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी हिने देखील आलियाला एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

तिने आलियाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या फोटोमध्ये आलिया वीरभद्रासन करताना दिसते आहे. Happy Happy Birthday to this beautiful Warrior अशी कॅप्शन टाकत तिने आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वीरभद्रासन हे एक अवघड आसन आहे आणि पण नियमित सराव केल्यास त्याची पोझ परफेक्ट जमू शकते. आलियाने तर वीरभद्रासन केले आहेच, पण करिना कपूर आणि मलायका अरोरा यांनीही वीरभद्रासन केल्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत...

 

कसे करायचे वीरभद्रासन?
- सरळ उभे रहा.
- दोन्ही पायांमध्ये ३ ते ४ फूट अंतर ठेवा.
- दोन्ही हात खांद्याच्या रेषेत दोन्ही बाजूंना पसरवा.
- यानंतर उजव्या पायाचा तळवा उजवीकडे वळवा आणि पाय गुडघ्यातून वाकवा.
- आता शरीर तसेच ठेवून मान उजवीकडे वळवा.
- ही अवस्था ३० सेकंद टिकवा.
- काही जण हे आसन आणखी वेगळ्या पद्धतीनेही करतात. त्यामध्ये दोन्ही हात डोक्यावर घेऊन नमस्कार केल्याप्रमाणे एकमेकांना जोडले जातात. 
- एकाबाजूने केल्यानंतर हीच क्रिया दुसऱ्या बाजूने करावी आणि वेळही समानच ठेवावी. 

 

वीरभद्रासन करण्याचे फायदे
- शरीर सुडौल होऊन शरीराला योग्य आकार मिळण्यासाठी वीरभद्रासन करावे.
- हात, कंबर, मांड्या आणि पोटऱ्या येथील स्नायूंचा व्यायाम होण्यासाठी वीरभद्रासन उपयुक्त ठरते.
- बैठे काम करणाऱ्यांना कंबर, पाठ आखडून गेल्याचा त्रास अनेकदा जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी वीरभद्रासन करावे.
- मानसिक संतूलन चांगले राहण्यास मदत होते. 
- हिप्स फॅट कमी करण्यासाठीही वीरभद्रासन उपयुक्त ठरते. 

 

Web Title: Want to burn extra fats? try this yogasana like Alia Bhatt, Read the benefits of Veerbhadrasana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.