Lokmat Sakhi >Fitness > ''धकधक गर्ल'' सारखं पन्नाशीनंतरही यंग आणि फिट दिसायचंय? माधुरी दीक्षित ब्रेकफास्टला नक्की खाते काय?

''धकधक गर्ल'' सारखं पन्नाशीनंतरही यंग आणि फिट दिसायचंय? माधुरी दीक्षित ब्रेकफास्टला नक्की खाते काय?

Madhuri Dixit Diet माधुरी दीक्षितसाठी सकाळचा नाश्ता खूप महत्वाचं आहे. मात्र ती साधासोपा नाश्ता करते कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 04:30 PM2022-11-24T16:30:35+5:302022-11-24T16:33:58+5:30

Madhuri Dixit Diet माधुरी दीक्षितसाठी सकाळचा नाश्ता खूप महत्वाचं आहे. मात्र ती साधासोपा नाश्ता करते कारण..

Want to look young and fit even after fifty like "Dhak Dhak Girl"? What exactly does Madhuri Dixit eat for breakfast? | ''धकधक गर्ल'' सारखं पन्नाशीनंतरही यंग आणि फिट दिसायचंय? माधुरी दीक्षित ब्रेकफास्टला नक्की खाते काय?

''धकधक गर्ल'' सारखं पन्नाशीनंतरही यंग आणि फिट दिसायचंय? माधुरी दीक्षित ब्रेकफास्टला नक्की खाते काय?

बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितची जादू आजही लोकांवर कायम आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. स्वतःला तरुण आणि निरोगी ठेवण्यासाठी ती आरोग्याची विशेष काळजी घेते. आज ती ५५ वर्षांची झाली असली तरी देखील तितकीच तरुण आणि फिट दिसते. तिच्यासाठी नृत्य खूप महत्वाचं आहे. कारण नृत्य आणि घायाळ अदांमुळेच तिला खरी ओळख मिळाली. एका मुलाखतीत तिने आपल्या डाएट संदर्भात खुलासा केला. तिच्यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो. त्यात ती काय काय समाविष्ट करते, ते वाचा..

माधुरीने सांगितले की, ती रोज नाश्त्यात नारळ पाणी पिते. ती कितीही व्यस्त असली तरी देखील वेळात वेळ काढून नारळ पाणी  पितेच. ती सांगते, “मला पोहे खूप आवडतात आणि नाश्त्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे. माझ्या मुलांनाही पोहे  आवडतात. याशिवाय मला शेंगदाणे, खोबरे खायला खूप आवडतं. जर माझ्याकडे न्याहारीसाठी पोहे नसेल तर मी ओट्स, डोसा किंवा उपमा नक्की खाते. ओट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे."

ओट्स आरोग्यासाठी फायदेशीर

ओट्समध्ये बऱ्याच प्रमाणावर फायबर असते. जे शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यास मदत करते. याशिवाय ओट्स खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे जास्त जेवणाची इच्छा होत नाही. 

ओट्समध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर असतात, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. याशिवाय ओट्समुळे कोलेस्टेरोलची पातळीही नियंत्रित राहते.

ओट्समध्ये असलेले फायबर, मिनरल्स आणि थायमिन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे शरीराला अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. याशिवाय ते चयापचय वाढवण्यासही खूप मदत करते.

Web Title: Want to look young and fit even after fifty like "Dhak Dhak Girl"? What exactly does Madhuri Dixit eat for breakfast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.