Lokmat Sakhi >Fitness > पायांची अतिरिक्त चरबी कमी करायची? जीम जाण्याचाही कंटाळा आलाय, ५ घरगुती व्यायाम, दिसेल रिझल्ट

पायांची अतिरिक्त चरबी कमी करायची? जीम जाण्याचाही कंटाळा आलाय, ५ घरगुती व्यायाम, दिसेल रिझल्ट

Lose Extra Legs Fat By Home Exercise हिवाळ्यात बहुतांश जणांना जीम जाण्याचा कंटाळा येतो, मात्र घरी बसून देखील वजन प्रचंड वाढते. यासाठी ५ व्यायाम, चरबी होईल कमी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 06:24 PM2022-12-27T18:24:01+5:302022-12-27T18:25:01+5:30

Lose Extra Legs Fat By Home Exercise हिवाळ्यात बहुतांश जणांना जीम जाण्याचा कंटाळा येतो, मात्र घरी बसून देखील वजन प्रचंड वाढते. यासाठी ५ व्यायाम, चरबी होईल कमी.

Want to lose extra leg fat? Tired of going to the gym, 5 home exercises, you will see the result | पायांची अतिरिक्त चरबी कमी करायची? जीम जाण्याचाही कंटाळा आलाय, ५ घरगुती व्यायाम, दिसेल रिझल्ट

पायांची अतिरिक्त चरबी कमी करायची? जीम जाण्याचाही कंटाळा आलाय, ५ घरगुती व्यायाम, दिसेल रिझल्ट

शरीरात जमलेली अतिरिक्त चरबी आपल्या शरीरासाठी हानिकारक मानली जाते. ही चरबी जर मांड्यांमध्ये दिसून आली की प्रचंड विचित्र वाटते. या कारणामुळे आपण आपल्या आवडीचे कपडे देखील परिधान करू शकत नाही. लठ्ठपणा ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या बनली आहे.

बिघडलेली जीवनशैली ही या समस्येमागे मोठे कारण बनले आहे. हिवाळ्यात आपण व्यायाम करण्यास टाळाटाळ करतो. या कारणामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. सतत बसून राहिल्याने देखील मांड्यातील अतिरिक्त चरबी वाढत जाते. ही अतिरिक्त चरबी आपल्याला घरच्या घरी कमी करायची असेल तर काही घरगुती व्यायाम करून पाहा.

ब्रिस्क वॉक

ब्रिस्क वॉक आपल्याला पायांना आकार देण्याचे काम करते. हे वॉक नियमित केल्यावर मेटाबॉलिज्म रेट वाढतो. त्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते. यासह हॅमस्ट्रिंग्स आणि ग्लूटील स्नायूंना उत्तेजित करते. जे केल्याने पायांना टोन्ड आकार मिळतो.

नियमित धावणे

मांडीची चरबी कमी करण्यासाठी धावणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. याने पायांच्या स्नायू मजबूत करण्यास मदत मिळते. परंतु, अधिक वेळ धावल्याने पायांना सूज अथवा गुडघे दुखण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे ज्यांना धावण्याची सवय नाही त्यांनी सुरुवातीला कमी वेळ धावावे.

थाई प्रेस

मांडीची चरबी कमी करण्यासाठी, थाई प्रेस हा उत्तम व्यायाम आहे. थाई प्रेस केल्याने पायांची स्थिरता वाढते. यासह पायांच्या स्नायू मजबूत होतात. याने मांडीची अतिरिक्त चरबी कमी होते.

जंपिंग जॅक

जंपिंग जॅक एक प्रभावी व्यायाम आहे. याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हा व्यायाम करण्यासाठी, प्रत्येक हवेत उडी मारताना, हात बाहेर आणि वर पसरवा, पाय नितंब-रुंदी वेगळे ठेवा. मग हळू हळू जमिनीवर झोपा, तुमचे पाय एकत्र करा आणि हात बाजूला करा. याने संपूर्ण शरीराची हालचाल होते.

सुमो स्क्वॅट्स

या मध्ये आपल्याला आपले पाय खांद्याच्या रुंदीच्या बाहेर ठेवायचे आणि आपले टोज थोडे बाहेरील बाजूस फिरवायचे आणि हा स्क्वॅट करायचा , याचा उभा राहण्याचा फॉर्म सुमो पेहलवाना सारखा आहे म्हणून याला सुमो स्क्वॅट म्हणतात.

Web Title: Want to lose extra leg fat? Tired of going to the gym, 5 home exercises, you will see the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.