ब्रेसीयर हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. घरातून बाहेर पाऊल टाकायचे म्हटले की महिलांना सर्वातआधी 'ब्रेसियर' घालावी लागते. दिवसभर स्त्रियांना या 'ब्रा' चा वापर करावा लागतोच. आपलं शरीर सुडौल (Yoga for Your Back) आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी ब्रा वापरणं अतिशय गरजेचं असत. स्त्रियांच्या या ब्रेसियरचे एक सोडून अनेक प्रकार असतात(Yoga Poses For Back Fat : Back and Waist Toning Exercises)
ब्रेसियर घेताना ती योग्य मापाची असणे देखील तितकेच महत्वाचे असते. काहीवेळा आपण ब्रेसियर घेताना ती फारच लूज किंवा टाईट मापाची घेतो. यामुळे ही ब्रेसियर आपल्याला व्यवस्थित बसत नाही. यासोबतच काहीवेळा आपल्या शरीरावर असणारे फॅट्स (How do I reduce my bra bulge) या टाईट ब्रेसियर घातल्याने अधिकच हायलाईट होऊन दिसते. काही महिलांचे पूर्ण शरीर तंदुरुस्त असते, परंतु पाठीवर चरबी असल्याने, ब्रा घातल्यानंतर बाजूची चरबी दिसून येते. ब्रा मुळे दिसणार्या या अतिरिक्त चरबीला ब्रा बल्ज (3 exercises to reduce bra bulge at home) असे म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी परफेक्ट ब्रा घालणे महत्त्वाचे असते. आपले आरोग्य आणि स्तनांसाठी ब्रा ही कायम परफेक्ट मापाचीच असावी. काही खास प्रकारच्या आऊटफिट्स मधून काही महिलांचे हे ब्रा बल्ज (3 yoga poses to reduce back body fat quickly) दिसतात. असे ब्रा बल्ज (Get Rid Of Your Bra Bulge With These 3 Exercises And Yoga Poses) दिसू नयेत म्हणून काही सोपी योगासन करुन आपण हे ब्रा बल्ज (bra bulge) कायमचे दूर करु शकतो. ब्रा बल्ज दिसू नये म्हणून नेमकी कोणती योगासन करावीत ते पाहूयात(Want to reduce the bra bulge Try 3 exercises to trim back fat).
ब्रा बल्ज दिसून येऊ नयेत म्हणून करायची योगासन...
१. सेतुबंधासन :- ब्रा बल्ज कमी करण्यासाठी सेतू बंधनासन हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. सेतू बंधनासन केल्याने शरीरात रक्तप्रवाह वाढवण्यास मदत होते आणि याच्या नियमित सरावाने अतिरिक्त चरबी देखील कमी करण्यात मदत केली जाते. सर्वात प्रथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे करताना दोन्ही हात जमिनीवरच रहावेत. कमरेचा भाग जितका शक्य होईल तितकाच वर उचलावा. सवयीनुसार आणि शरीराच्या लवचिकतेनुसार त्याची क्षमता वाढवता येईल. या स्थितीत काही सेकंदं थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या स्थितीत यावे.
टर्किश गेटअप एक्सरसाईज म्हणजे काय ? हा नवा ट्रेण्ड इतका चर्चेत का आहे ?
ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?
२. धनुरासन :- धनुरासन हे असे आसन आहे, ज्यावर शरीराची मुद्रा धनुष्यासारखी दिसते. म्हणूनच त्याला धनुरासन म्हणतात. हे पाचक प्रणाली मजबूत करते आणि हाडांच्या स्नायूंचे तापमान वाढवते. याशिवाय, हे पाठीच्या हाडांमध्ये लवचिकता आणते. पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि मांड्यांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी हे फायदेशीर आहे. यासोबतच हे आसन ब्रा बल्ज कमी करण्यासाठी देखील उपयोगी आहे. योगा मॅटवर पोट चिकटेल असे पोटावर झोपा, पाय जवळ ठेवा आणि हात पायाजवळ ठेवा. हळूवारपणे गुडघे वाकवा आणि हातांनी दोन्ही पायांच्या घोट्यांना धरा. नाकाने श्वास आत घ्या आणि शरीराला आतल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करा आणि छाती वर करा आणि मांड्या जमिनीवरून उचला. हातांनी पाय ओढा. नंतर समोरच्या बाजूला बघा. तुमचे लक्ष श्वासाच्या वेगावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. शरीराची स्थिती धनुष्यासारखी झाली पाहिजे. हात धनुष्याच्या ताराप्रमाणे काम करतील. जवळपास १५ ते २० सेकंदानंतर श्वास सोडा आणि पुन्हा आपल्या सामान्य स्थितीमध्ये या.
३. चक्रासन :- या योग आसनाच्या नियमित सरावाने पाठीची चरबी कमी होते आणि ब्रा बल्ज कमी करण्यात देखील याचा फायदा होतो. हे योग आसन शरीरात ऊर्जा आणि उबदारपणा राखते आणि शरीराला चांगले पोश्चर देखील आणते. चक्रासन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर सतरंजी, योगा मॅट टाका आणि पाठीवर झोपा. यानंतर डोक्याच्या बाजूला दोन्ही हातांचे तळवे टेकवा. पाय गुडघ्यात दुमडा आणि तळपाय नितंबाच्या जवळ घ्या. आता तळहात आणि तळपायावर भर देऊन पाठ, कंबर, मान, डोके उचला. सुरुवातीला एकदम हे आसन जमणार नाही. त्यामुळे जेवढे जमेल तेवढेच करा. आसनस्थिती ३० ते ४० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. या ३ योगासनांचा नियमित सराव केल्याने ब्रा बल्ज कमी होण्यास मदत होते.
तुम्ही पण सुडौल दिसण्यासाठी 'बॉडी शेपवेअरचा' वापर करता? तज्ज्ञ सांगतात....