Lokmat Sakhi >Fitness > मलायका आणि अर्जुन कपूरमुळे वॉटर वर्कआऊट चर्चेत; हे वॉटर वर्कआऊट असते काय? हा कोणता व्यायाम ट्रेंड?

मलायका आणि अर्जुन कपूरमुळे वॉटर वर्कआऊट चर्चेत; हे वॉटर वर्कआऊट असते काय? हा कोणता व्यायाम ट्रेंड?

Benefits of water workout: जीम, योगा, चालणे, धावणे.... असे व्यायाम तर आपल्याला माहितीच आहेत. वॉटर वर्कआऊट म्हणजेच पाण्यात करायचं वर्कआऊट हा प्रकार तुम्ही ऐकलाय का? नुकतंच असं वर्कआऊट केलं आहे अर्जुन कपूर आणि मलायका (Arjun Kapoor and Malaika Arora) या हॉट आणि बोल्ड कपलने. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 03:57 PM2021-12-07T15:57:40+5:302021-12-07T17:09:04+5:30

Benefits of water workout: जीम, योगा, चालणे, धावणे.... असे व्यायाम तर आपल्याला माहितीच आहेत. वॉटर वर्कआऊट म्हणजेच पाण्यात करायचं वर्कआऊट हा प्रकार तुम्ही ऐकलाय का? नुकतंच असं वर्कआऊट केलं आहे अर्जुन कपूर आणि मलायका (Arjun Kapoor and Malaika Arora) या हॉट आणि बोल्ड कपलने. 

Water workout by Malaika Arora and Arjun Kapoor, What is water workout? what are the health Benefits | मलायका आणि अर्जुन कपूरमुळे वॉटर वर्कआऊट चर्चेत; हे वॉटर वर्कआऊट असते काय? हा कोणता व्यायाम ट्रेंड?

मलायका आणि अर्जुन कपूरमुळे वॉटर वर्कआऊट चर्चेत; हे वॉटर वर्कआऊट असते काय? हा कोणता व्यायाम ट्रेंड?

Highlightsभ्यासकांच्या मते जमिनीवर करण्यात येणाऱ्या वर्कआऊटपेक्षा पाण्यातले वर्कआऊट १५ पट अधिक परिणामकारक असतात.

घाम न गाळताही वजन कमी (weight loss) करता येतं...असं जर कुणी सांगितलं तर चटकन विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट अगदी खरी आहे. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच ऐकत, बघत आणि करत असतो. कधी योगा तरी कधी जीम, कधी धावणे, चालणे तर कधी सायकलिंग... असं सतत काही ना काही सुरू असतं. पण याच जोडीला आणखी वर्कआऊटचा आणखी एक प्रकारही चांगलाच गाजतो आहे. आपल्याकडे या प्रकाराचा अजून फार काही गाजावाजा नसला तरी विदेशात मात्र वॉटर वर्कआऊट (water workout in marathi) म्हणजेच पाण्यात करण्याचे व्यायाम हा प्रकार लोकांना चांगलाच आवडतो आहे.

 

सध्या आपल्याकडे कडाक्याची थंडी असल्यामुळे आपण इच्छा असूनही हे वर्कआऊट करून बघू शकणार नाही. त्यामुळे थोडी वाट बघा.. पण येणाऱ्या उन्हाळ्यात मात्र हे वर्कआऊट हमखास ट्राय करा. बऱ्याचदा उन्हाळ्यात खूप घाम घाम होत असल्याने व्यायामाचा जाम कंटाळा येतो. त्यामुळे साहजिकच आपण जेवढा व्यायाम इतर ऋतूत करतो, त्यापेक्षा निश्चितच कमी व्यायाम आपला उन्हाळ्यात हाेतो. म्हणूनच तर अजिबात घाम न गाळणारं परंतू आपल्याला अतिशय फिट ठेवणारं वॉटर वर्कआऊट उन्हाळ्यात (best workout for summer) करायला काहीच हरकत नाही. वॉटर वर्कआऊट म्हणजे पाण्यात केवळ पोहणे नाही. पोहणे हा वॉटर वर्कआऊटचा एक भाग आहेत. ज्यांन पोहायला येत नाही, ते देखील कमी पाण्यात वॉटर वर्कआऊटचे वेगवेगळे प्रकार करू शकतात. 

 

वॉटर वर्कआऊट पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. हाेय.. हे दोघे सध्या सुटी सेलिब्रेट करायला मालदिवला गेले आहेत. तिथे सुटीतही त्यांनी त्यांचं वर्कआऊट सोडलेलं नाही. अर्जुन कपूरने या विषयीची पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तो म्हणतो की मी माझ्या सुटीतही वर्कआऊट करत आहे. जेव्हा तुमची गर्लफ्रेंड तुमच्या ट्रेनरपेक्षाही अधिक कडक शिस्तीची असते, तेव्हा तुम्हाला हे सगळं करावंच लागतं, असंही त्याने या पोस्टमध्ये मलायकाबाबत म्हटलं आहे. या पोस्टमध्ये अर्जूनने जो व्हिडियो शेअर केला आहे, त्यामध्ये मलायका आणि अर्जुन दोघंही स्विमिंग पूलमध्ये वॉटर वर्कआऊट करताना दिसत आहेत. 

 

वॉटर वर्कआऊट करण्याचे फायदे
Benefits of water workout

- झटपट वजन कमी करण्यासाठी वॉटर वर्कआऊट उपयुक्त आहे.
- उन्हाळ्यात खूप घाम येत असल्याने व्यायाम करणे जमत नसेल, तर वॉटर वर्कआऊट करावे. 
- कंबर, गुडघे आणि हाडांच्या मजबुतीसाठी वॉटर वर्कआऊट प्रभावी मानले जाते.
- काही अभ्यासकांच्या मते जमिनीवर करण्यात येणाऱ्या वर्कआऊटपेक्षा पाण्यातले वर्कआऊट १५ पट अधिक परिणामकारक असतात.
- अतिरिक्त कॅलरी लवकर बर्न करण्यासाठी वाॅटर वर्कआऊटची मदत घ्यावी.

 

हे आहेत वॉटर वर्कआऊटचे काही प्रकार
types of water workout
टाइसेप्स डिप्स

या प्रकारात तळहात स्विमिंग पुलच्या कठड्यावर ठेवावेत. तळहातावर जोर देऊन शरीर जेवढे वर उचलता येईल, तेवढे वर उचलावे. काही सेकंद या अवस्थेत रहावे. १५ ते २० वेळा हा व्यायाम करावा. हा व्यायाम केल्यामुळे छाती, हात मजबूत होतात.
लेग कर्ल
हॅमस्ट्रिंगचे दुखणे असणाऱ्यांसाठी हा एक अतिशय चांगला व्यायाम आहे. लेग कर्ल म्हणजे पळण्याच्या अवस्थेत पाण्यात पाय हलविणे. पाण्यात पळणे जमिनीवर पळण्यापेक्षा अधिक कठीण आहे. हा व्यायाम करण्यासाठी हातांनी पुलचा काठ पकडा आणि पाय पळण्याच्या अवस्थेत ह लवा. यामुळे पायांना मजबूती मिळते तसेच श्वसन क्रियाही अधिक कार्यक्षम होते. 

 

Web Title: Water workout by Malaika Arora and Arjun Kapoor, What is water workout? what are the health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.