सध्याच्या स्थितीत वजन कमी असणं (Weight Gain) ही गंभीर समस्या बनली आहे. (How to Gain Weight Faster) भरपूर लोक सड पातळ शरीर आणि कमी वजनामुळे त्रस्त असतात. वजन कमी असेल तर फक्त सौंदर्यावरच नाही तर अनेक आरोग्याच्या समस्यांचाही धोका उद्भवू शकतो. (Weight Gain Chapati) बरेच लोक चांगला आहार घेतात पण बरेच प्रयत्न करूनही त्यांचे वजन वाढत नाही. जर तुमचे वजन कमी असेल आणि तुम्ही सडपातळ दिसत असाल तर हाडं आणि हृदयाच्या समस्याही उद्भवू शकतात. इतकंच नाही तर तुमची इम्यून सिस्टिम कमकुवत होऊ शकते. (Eat These 4 Types Of Flour To Gain Weight Healthiest Way According To Dietician)
वजन खूपच कमी असेल तर रक्ताची कमतरता होणं, थकवा, कमकुवतपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. बारीक लोकांना त्यांच्या शरीरयष्टीवरून अनेकदा बोललं जातं. (Foods For Weight Gain) हे टाळण्यासाठी काही पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांनी काही पिठांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यात गव्हाच्या पिठाचा तुम्ही समावेश करू शकता. या पिठाच्या सेवनाने तुम्हाला हेल्दी पद्धतीने वेट गेन करण्यास मदत होईल.
1) नारळाचे पीठ
हेल्थ लाईनच्या रिपोर्टनुसार नारळाचे पीठ ग्लुटेन फ्री असते, सुकलेलं नारळ दळून हे पीठ बनवलं जातं. यात गव्हाच्या पिठाच्या तुलनेत जास्त प्रमाणात कॅलरीज, प्रोटीन्स, फॅट, फायबर्स आणि आयर्न, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स असतात. ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. याशिवाय सूज कमी होते आणि मेटाबॉलिझ्म वाढण्यासही मदत होते. हे पीठ एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असते. यात एंटी मायक्रोबियल गुणसुद्धा असतात.
200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं
2) बदामाचे पीठ
बदामाचे पीठ बनवण्यासाठी सगळ्यात आधी उकळलेले बदाम बारीक वाटून त्याची पावडर बनवून घ्या. हे ग्लुटेन फ्री असते. बदामाच्या पिठात मॅग्नेशियम, ओमेगा-३, अनसॅच्युरेडेट फॅट्स, प्रोटीन्स आणि व्हिटामीन ई असते. यात प्रोटीन्स आणि कॅलरीजेच प्रमाण जास्त असते. याशिवाय वजन वाढण्याबरोबरच इम्यून सिस्टिमही मजबूत होते. कोलेस्टेरॉल, बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
3) क्विनोआ
क्विनोआचे पीठ वाटून त्याची बारीक पावडर तयार करून घ्या. हे ग्लुटेन फ्री पीठ खाल्ल्याने वजन वेगाने वाढते कारण यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. खासकरूनयात प्रोटीन्स, फायबर्स, आयर्न आणि अनसॅच्युरेडेट फॅट्स असतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात.
कंबर दुखते, अशक्तपणा येतो? व्हिटामीन बी-१२ देणारे ५ पदार्थ खा; तरतरी येईल-हाडं होतील बळकट
4) तांदळाचे पीठ
वजन वाढवण्यासाठी तुम्ही तांदूळाच्या पिठाचा आहारात समावेश करू शकता. जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर याचे कमीत कमी प्रमाणात सेवन करा. कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. तांदूळाची भाकरी किंवा भाताचा आहारात समावेश करा.