Join us  

दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढलं, अंग जड पडलं? करिना कपूर करतेय तो व्यायाम करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 8:08 AM

Exercises For Weight Loss and Inches Loss: दिवाळीचा फराळ खाऊन झाला आणि सुट्ट्यांमधला आराम संपला की असा त्रास अनेक जणांना होतो. त्यावरचाच तर उपाय सांगते आहे करिना कपूर (Kareena Kapoor).

ठळक मुद्देइंचेस लॉस, वेटलॉस करण्यासाठी हे तिन्ही व्यायाम अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत

दिवाळीचे चार दिवस कसे भुर्रकन उडून जातात. पाहूणे- नातलग- मित्रमंडळी यांच्या सहवासात भरपूर खाणं होतं. फराळावर (diwali faral), गोडधोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारला जातो. तेलकट- तुपकट पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घेतला जातो. खाताना आपण विचार करत नाही. जिभेचे भरपूर लाड करतो. पण त्यानंतर मात्र मग वजन किंचित वाढलंय की काय, वजन वाढून अंग जड तर पडलं नाही ना, असा विचार करू लागतो. तुमचंही असंच झालं असेल आणि तुम्हालाही दिवाळी झाल्यानंतर वजन वाढल्यासारखं वाटत असेल, तर करिना कपूर (Kareena Kapoor) करतेय तसा व्यायाम (exercises) करा.

 

दिवाळीनंतर करिना कपूर चांगलीच व्यायामाला लागली आहे. अर्थात ती एवढी फिटनेस फ्रिक आहे की दिवाळीतही तिने व्यायाम केला असणारच.

दिवाळीचा फराळ उरलाय? फराळ जास्त दिवस उत्तम राहण्यासाठी ३ उपाय, खराब होण्याची भीती नाही..

पण आता आपल्या चाहत्यांना दिवाळीनंतर व्यायामासाठी पुन्हा एकदा मोटीव्हेट करण्यासाठी तिने एक जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती एकूण ३ व्यायाम करताना दिसत असून तिन्हीही व्यायाम चांगलेच कठीण आहेत.

 

कोणते व्यायाम करतेय करिना कपूर?१. करिना कपूर पहिला व्यायाम ट्रेडमिलवर करते आहे. ट्रेडमिलवर चालायचं किंवा धावायचं, हा व्यायाम आपल्याला माहिती असतो. पण करिना जो व्यायाम करते आहे, त्यात ट्रेडमिलवर बसली आहे. तळहात ट्रेडमिलच्या दोन्ही बाजूंना टेकवले असून पायने ती ट्रेडमिल ढकलते आहे. यावेळी तळहात आणि तळपाय यावर तिच्या संपूर्ण शरीराचा बॅलेन्स आहे.

सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते..

२. दुसऱ्या प्रकारात तिने हॅण्डस्डॅण्ड केले आहे. यामध्ये एक पाय तिने भिंतीला टेकविला असून दुसरा पाय भिंतीपासून अलगद दूर करण्याचा तिचा प्रयत्न आहे.

३. तर तिसऱ्या व्यायाम प्रकारात ती ट्रेडमिलवर रनिंग करताना दिसत आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामकरिना कपूर