बॉलीवूडमध्ये मसान चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणारा अभिनेता विक्की कौशल आता करोडोंचा चाहता स्टार आहे. आता त्याची पर्सनॅलिटी पाहून लोकांना विश्वास होत नाही की, मसानमध्ये जो सडपातळ कॉलेजचा विद्यार्थी होता तो विक्की आता असा दिसतो. सुरूवातीला कॉलेज स्टुडंटनंतर आर्मी ऑफिसरचा रोल करत विक्की करोडो लोकांमध्ये लोकप्रिया झाला आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटात विक्कीचे ट्रांसफॉर्मेशन पाहून सगळेचजण हैराण झाले.
या चित्रपटात आर्मी ऑफिसरची भूमिका करण्यासाठी विक्कीनं १५ किलो वजन वाढवून स्वतःमध्ये बदल केला. त्यानंतर विक्की अशा लोकांसाठी प्रेरणा बनला जे वजन वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. विक्कीसाठी १५ किलो वजन वाढवणं सोपं नव्हतं. त्यानं इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर वर्कआऊटच्या फोटोजसह वजन वाढवण्याच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत.
#UriTheSurgicalStrike साठी विक्कीला दिवस रात्र ट्रेनिंग घ्यावी लागली होती. १५ किलोग्राम मासपेशींसह वजन वाढवणं सोपं नव्हतं. माझे ट्रेनर @rakeshudiyar आणि त्यांची टिम @amol_kyatam आणि मंगेश यांनी मला सतत घाम गाळायला लावला. तेव्हा मी ओरडलो आणि रडलोसुद्धा. जेणेकरून मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकेन. असं विक्की सांगतो. #HowIsTheJosh यात विक्कीनं वजन वाढवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
एक्टोमोर्फ काय आहे?
एक्टोमोर्फ हा असा प्रकार आहे ज्यात व्यक्ती नौसर्गिकरित्या सडपातळ असते. वजन वाढवण्यासाठी जास्त कॅलरीज घेण्याची आवश्यकता असते. एक्टोमोर्फ व्यक्तींमध्ये मेटाबॉलिज्म जलद गतीनं असतो. म्हणून वजन वाढणं कठीण होतं. विक्की कौशलसुद्धा याच श्रेणीत येतो. त्याचा बॉडी टाईप एक्टोमोर्फ होता. आता मात्र तो माचो एक्टर्सच्या यादीत गणला जातो.
जास्त झोपा
जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला थोडी विश्रांती देता, तेव्हा तुम्ही व्यायाम केल्यानंतरचे मसल्स उबरण्यास आणि स्नायू विकसित होण्यास वाव मिळतो. अशा स्थितीत वजन वाढवण्यासाठी तुम्हाला खूप मदत मिळते.
जास्त खा
जर तुम्ही सडपातळ असाल तर तुमच्या शरीराला सतत खाण्याची आवश्यकता आहे. अशावेळी आपल्या आहारात प्रामुख्याने कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा. आपण दर काही तासांनी ते खाण्याची सवय लावली पाहिजे.
रूटीनमध्ये वर्कआऊटचा समावेश असावा
व्यायाम दोन पद्धतीनं आपली भूमिका निभावतो. वेटलॉससाठी तुम्हाला व्यायामाची आवश्यकता असते तर वेट गेनं करण्यासाठीही तुम्हाला वर्कआऊट करावं लागतं. त्यासाठी आपण ट्रेनर्सनच्या सल्ल्यानुसार स्क्वॉट, डेडलिफ्ट, शोल्डर प्रेस, बेंच प्रेस असे व्यायाम करायला हवेत. जेणेकरूम मसल्स फॉर्मेशन होण्यास मदत होईल.