अनेकजण शारीरिक कमकुवतपणामुळे स्वत:चा आत्मविश्वास गमावतात. वजन वाढण्यासाठी घरगुती उपायांच्या शोधात असतात पण वजन काही वाढत नाही. डाएट आणि व्यायामाचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करून तुम्ही दिवसाची सुरूवात केल्यास चांगले बदल दिसायला सुरूवात होईल वजन वाढण्यासाठी काय खायचं, कोणते उपाय करायचे असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात. (Benefits of Dates with Milk at Night)
वजन वाढवण्यासाठी दिवसाची सुरूवात पोषक तत्वांनी करावी. रात्री दूधासह खजूर खाल्ल्यानं वजन वाढतं. जे लोक आपलं वजन वाढवू इच्छितात त्यांनी न चुकता रोज रात्री दुधाचे सेवन करावे. हेल्दी वेट गेनसाठी तुम्ही जितक्या कॅलरीज बर्न करता त्यापेक्षा अधिक कॅलरीजचं सेवन करायाल हवं. जेनेटिक, मेटाबॉलिझ्म, सतत औषधांचे सेवन करणं कमी वजनाची मुख्य कारणं आहेत. (Can We Eat Dates With Milk)
खजूर घालून दूध कसे तयार करावे?
1) रात्री दूधासह खजूर खाल्यानं शरीरात होणारे बदल आश्चर्यकारक असतात. दूध आणि खजूर एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. रात्री झोपण्याआधी याचे सेवन करणं तब्येतीसाठी उत्तम मानले जाते. सकाळी उठल्यानंतरही तुम्ही दूध आणि खजूर खाऊ शकता. दोन किंवा तीन खजूर घालून दूध मंद आचेवर पाच मिनिटांपर्यंत उकळवा. झोपण्याआधी खजूर आणि गरम दूधाचे सेवन करा.
2) एका भांड्यात 1 कप दूध घाला, त्यात 2-3 चिरलेले खजूर, 5 चिरलेले बदाम, 5 चिरलेले पिस्ते, केशर आणि वेलची पूड घाला आणि एक उकळी आणा नंतर हे दूध प्या.
३) खजूर आरोग्यासाठीही उत्तम असतात कारण त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, जस्त आणि लोहासारखी खनिजे असतात. याशिवाय दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते.
फायदे
१) हे एक हेल्दी प्रोटिन्सचा स्त्रोत आहे. प्रोटीन्स आपल्याला समाधानाची भावाना देतात. खजूर दुधासोबत खाल्लेले खूप चांगले असते. कारण त्यात कॅलरीज कमी असतात आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. याचा अर्थ ते रक्तातील साखरेची पातळी वाढवणार नाहीत आणि वजन वाढणार नाही. तरीही प्री डायबिटीक किंवा डायबिटीक लोकांनी खजूराचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२) जर तुम्ही तब्येत सुधारण्याच्या प्रयत्नात असाल तर खजूर हे झोपण्यापूर्वी खाण्यासाठी एक उत्तम नाश्ता आहे. कारण त्यामध्ये फायबर जास्त असते, जे तुम्हाला झोप येण्यास मदत करते. त्यात कॅल्शियम देखील असते, जे तुमची हाडे आणि दात निरोगी ठेवण्यास मदत करते.