जर तुम्ही कॅलरी कमी करू इच्छीत असाल किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर धावणं हा एक उत्तम व्यायाम आहे. (Fitness Tips) नियमित चालल्यानेही शरीराला भरपूर फायदे मिळतात पण चालण्याच्या तुलनेत धावणं जास्त पॉवरफूल ठरते. (Weight Loss Benefits Of Power Walk) उदाहरणार्थ १६० पाऊंड वजन असलेल्या व्यक्तीने ५ मील प्रती तासाच्या गतीने धावल्यास ६०६ कॅलरीज कमी होऊ शकतात. यावेळेत ३१४ कॅलरीज बर्न होण्यास मदत (Calorie Burn Exercise) होते.
एका अभ्यासात संशोधकांनी हृदयरोगाचा धोका असलेल्या लोकांमध्ये चालणं आणि पॉवर वॉक याची तुलना केली. यात त्यांना दिसून आले की पॉवर वॉक केल्याने चालण्यापेक्षा अधिक फायदे मिळतात. शरीराच्या वरच्या तसंच खालच्या स्नायूंना अधिक सक्रिय करता येते. (Ref) आर्म स्विंग, क्वॅड्रिसेप्स, हॅमस्ट्रिगचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे पॉवर वॉकींग तुमचा वेग वाढवते.
दुसऱ्या एका अभ्यासात दिसून आले की मध्यमवयीन महिलांमध्ये उच्च फिजिकल एक्टिव्हीजनंतर त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली होती आणि व्यायामाची तीव्रता हा मोठा घटक होता. ज्या स्त्रिया नियमित किंवा मध्यम किंवा जोरदार वेगाने चालतात त्यांच्यात वृद्धत्वाची लक्षणं कमीत कमी दिसतात.
एक पाऊंड वजन कमी करण्यासाठी जवळपास ३,५०० कॅलरीज जाळण्याची आवश्यकता असते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर धावणं हा उत्तम व्यायाम आहे. तुम्ही व्यायाम नवीनच सुरू केला असेल किंवा तुम्हाला धावायला त्रास होत असेल तर चालणं तुम्हाला सवय व्हायला मदत करेल. पायी चालणं फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे शरीर हेल्दी राहतं आणि बॉडी एर्नर्जेंटीक राहत इतकंच नाही तर स्टॅमिनासुद्धा वाढतो.
पॉवर वॉकिंगचे फायदे
पॉवर वॉकींग जवळपास ३ मील प्रति तास ते ५ मील प्रती तास करणं उत्तम मानलं जातं. पण काही लोक ७ ते १० मील प्रती तासांच्या गतीत पोहोचतात. पॉवर वॉकींगने जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. पॉवर वॉकिंगने कमीत कमी वेळात तुम्ही जास्त वजन कमी करू शकता.