Join us  

हा पाहा खास वेट लॉस डाएट प्लॅन, स्लिम होण्याचं सोपं सिक्रेट! वजनाचं टेंशन सोडा..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 1:41 PM

Weight Loss Diet Tips : वजन कमी करणं म्हणजे सुरुवातीला आपल्या चुकीच्या सवयी बदलणं आणि नव्या चांगल्या सवयी स्वत:ला लावून घेणं.

लठ्ठपणामुळे तुमचं वजन आणि ओव्हल ऑल लुक्सवर परीणाम होतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. (Weight Loss Diet Chart) आरोग्य तज्ज्ञांच्यामते तुम्ही आहारात बदल करून वजन कमी करू शकता.  खास डाएट चार्ट फॉलो केल्यास जवळपास  आठवड्यातभरात वजन थोड्या प्रमाणात कमी झालेलं दिसेल आणि शरीर टोन्ड व्हायला सुरूवात होईल. (Weight Loss Diet Tips)

वजन कमी करणे म्हणजे शरीरातील चरबी, स्नायू, पाणी आणि इतर घटकांपैकी कोणत्याही घटकांमुळे शरीराच्या वस्तुमानात होणारी घट.  जे कमी-कार्ब आहाराचे पालन करतात त्यांच्यासाठी, ग्लायकोजेन साठवण विशेषतः महत्वाचे असू शकते. "वजन कमी होणे" आणि "चरबी कमी होणे" हे गोंधळात टाकणे सामान्य आहे. शरीरावर आणि आरोग्यावर होणारे परिणाम वेगळे आहेत. (Indian Weight Loss Diet Plan)

वजन कमी होण्यसाठी जेवणाच्या सवयी बदला

१) सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात १ चमचा मध मिसळून प्या. मधासह लिंबू कधीही घेऊ नका. कारण व्हिटामीन सी चे गरम पाण्यासह सेवन केल्यानं मांसपेशी कमकुवत होतात.

२) सकाळच्या नाश्त्यात हलके फुलके पदार्थ खा. नाश्त्याला ओट्स किंवा दोन चपाती आणि १ वाटी उकळलेली डाळ खा. डाळींच प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे मांसपेशी मजबूत होता. ब्रेकफास्टनंतर एक तासानं  केळी किंवा सफरचंद खा, नाशत्यात  दूध, अंडी अशा पदार्थांचा समावेश करा.

३) दोन वाजण्याच्या आधी दुपारचं जेवण करा. दुपारच्या  जेवणात ब्राऊन राईस, डाळी, हिरव्या भाज्या खाणं फायदेशीर ठरतं.  ब्राऊन राईस फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. पचनक्रियासुद्धा चांगली राहते. उकळलेल्या हिरव्या भाज्या वजन वेगानं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

४) महिलांनी जेवणाच्या दोन तास आधी आहारात स्प्राऊट्स, चणे, हिरव्या मूगाच्या डाळीचे सेवन करायला हवे.  अधिक चवदार बनवण्यासाठी तुम्ही यात लिंबू किंवा चाट मसाला घालू शकता. स्प्राऊट्स वजन कमी करण्यासाठी आणि मांसपेशींना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे स्नायूंना चांगला आकार मिळतो.

५) रात्रीच जेवणं हलकं घ्या. रात्रीच्या जेवणात दोन चपात्या, उकळेल्या डाळी, हिरव्या भाज्यांचा समावेश करा. जेवणाच्या १ ते २ तासांनंतर एका ग्लासात  दूधात  भाजलेली हळद घालून प्या. यामुळे आजारांपासून दूर होण्यास मदत होईल आणि हेल्दी बॉडी वेट मेंटेन राहण्यास मदत होईल.  दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स