नवीन वर्ष यायला काहीच दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षात लोक बरेच संकल्प करतात. त्यापैकीच एक म्हणजे वजन कमी करणं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही नवीन वर्ष सुरू होण्याची वाट पाहण्याची काही आवश्यकता नाही. शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरतील. (Weight Loss Tips) पोटावरची चरबी कमी करण्यासठी वेट लॉस ड्रिंक हा एक परिणामकारक उपाय आहे.
यामुळे बेली फॅट कमी होऊन कंबर पातळ होते वजन कमी करण्यासाठी तुम्ही या बियांचा वापर करू शकता. या बियांना चिया सिड्स असं म्हणतात मसाल्यांच्या दुकानात या बिया मिळतील. (Weight loss drink for belly fat loss before new year 2023 know how to use chia seeds to lose weight)
चिया सिड्स
चिया सिड्चे पाणी वजन कमी करणारे पेय म्हणून वापरले जाऊ शकते. चिया सिड्स तयार करण्यासाठी ४० ग्रम चिया सिड्स आणि १ लिटर पाण्याची आवश्यकता असेल. तुम्ही यात चवीसाठी लिंबाचा रस घालू शकता. वेट लॉस ड्रिंक तयार करण्यासठी चिया सिड्स पाण्यात भिजवून ठेवा जवळपास २० ते ३० मिनिटांनी लिंबाचा रस यात मिक्स करा. सकाळच्यावेळी हे वेट लॉस ड्रिंक फायदेशीर ठरतं.
चिया सिड्समुळेव वजन कमी होतं?
चिया सिड्समध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. प्रोटीन-फायबरचे सेवन केल्याने पोट हळूहळू रिकामे होते आणि भूक बराच काळ नियंत्रणात राहते. अशावेळी तुम्ही कमी कॅलरी वापरता आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण चिया सिड्चे जास्त सेवन करू नका. कारण, यामुळे तुमच्या कॅलरीजही वाढू शकतात.
कमी होईल पोटावरची चरबी
जेव्हा तुम्ही कमी कॅलरीज घेता तेव्हा शरीराच्या कॅलरीज दैनंदिन कामांसाठी वापरल्या जातात. यामुळे पोट आणि इतर भागांवर जमा झालेलं फॅट बर्न होऊन त्याचं उर्जेसाठी वापरले जातात. पण कॅलरीजबरोबर प्रोटिन्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सचं कमी होणार नाही याची काळजी घ्या.
चिया सिड्स खाण्याची योग्य पद्धत
चिया सिड्स फक्त पाण्याबरोबर न घेता चविष्ट स्मूदी, सॅलड, दही, सूप इत्यादींमध्येही वापरता येतात. वजन कमी करण्याच्या आहारात चिया बियांचा समावेश करणे खूप सोपे आणि प्रभावी आहे.