वाढतं वजन प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या असते. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डायटिंगचासुद्धा आधार घेतला जातो. (How to loss Weight Faster) या दोन्ही गोष्टींसाठी एस्क्ट्रा स्ट्रगल करावे लागते पण या दोन्ही गोष्टी करण्यासाठी लोकांकडे वेळ नसतो. वजन कमी करण्यासाठी काही तुम्ही रोजच्या आहारात बदल केला किंवा रात्रीच्यावेळी १ वेट लॉस ड्रिंक घेतले तर काही दिवसांतच फरक दिसून येऊ शकतो. हा उपाय केल्याने पोटाची आणि कंबरेच्या आजूबाजूची चरबी कमी होण्यास मदत होईल. हे ड्रिंक बनवण्यासाठी लिंबाच्या रस वापरावा लागेल. अनेकजण सकाळच्यावेळी पाण्यात मध आणि लिंबू घालून याचे सेवन करतात. ( Weight Loss Lemon Water For Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी लिंबाचे ड्रिंक
लिंबू व्हिटामीन सी युक्त असतो याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते आणि मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. लिंबाच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिराकशक्ती वाढते. शरीरातील घाणेरडे टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात.
सद्गगुरू सांगतात जेवताना कसं, किती खावं याचे ५ नियम; वजन कंट्रोलमध्ये राहील-आजारही दूर
वजन कमी करण्यासाठी लिंबाचे ड्रिंक प्यायल्यास तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. रात्री लिंबू पाणी पिण्यासाठी सगळ्यात आधी १ ग्लास पाणी गरम करून त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा नंतर प्या. पाणी गरजेपेक्षा जास्त गरम असू नये. हे पाणी प्यायल्याने काही दिवसांतच चरबी कमी होण्यास मदत होते याशिवाय बॉडी शेपमध्ये येते.
पोट कमी करण्यासाठी कंबरेचा घेर कमी करण्यासाठी तुम्ही ओव्याचे पाणी पिऊ शकता. जीऱ्याचे पाणी फॅट बर्निंग गुणांनी परिपूर्ण असते. हे पाणी प्यायल्याने पचनक्रियाही चांगली राहते. रोज सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने शरीर पातळ दिसण्यास मदत होते. मेथीचे पाणी तयार करण्यासाठी अर्धा चमचा मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा नंतर सकाळी हे पाणी गरम करून गाळून याचे सेवन करा. दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून या पाण्याचे सेवन करा.
हिवाळ्यात करा मऊ-पौष्टीक ज्वारीची खिचडी; पचायला हलकी-करायला सोपी, खा गरमागरम खिचडी
जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर रात्री जास्त उशीरा जेवू नका. जेवल्यानंतर थेट झोपू नका. जेवल्यानंतर थोडावेळ वॉक करा नंतर झोपा. रात्री गोड पदार्थ अजिबात खाऊ नका. खिचडी, भाकरी, वरण भात असे पचायला हलके असणारे पदार्थ खा.