Join us  

Weight Loss Faster Tips : पोट, मांड्याचा आकार कमी होतच नाहीये? रोज ४ गोष्टी करा, महिनाभरात वजन झरझर घटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 8:57 AM

Weight Loss Faster Tips : शिक्षेसारखे वाटण्याऐवजी व्यायामाचा आनंद घ्या. तुम्ही नियमित झालात की तुमच्या ध्येयानुसार एक एक करून इतर व्यायाम सुरू करा.

वाढत्या वयानुसार, हार्मोनल बदलांमुळे अनेक महिलांचे वजन वाढू लागते. वाढत्या वजनामुळे महिलांचे व्यक्तिमत्व तर बिघडतेच शिवाय त्यांना त्यांचे आवडते कपडे घालता येत नाहीत तर पोटावर लटकलेल्या चरबीमुळे काही महिला साडी नेसण्यासही कचरतात.(How to Lose Weight Fast But Safely)  याशिवाय, लठ्ठपणामुळे टाईप-2 मधुमेह, रक्तदाब आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो, हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. (How to Start Your Journey to Lose Weight )

स्त्रिया लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात जेणेकरून त्यांचा लठ्ठपणा कमी होईल आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहता येईल. पण अशा अनेक महिला आहेत ज्या घरात आणि बाहेरच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की त्यांना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही.(How to Lose Weight Fast in 4 Simple Steps)

आज आम्ही अशा 4 गोष्टी घेऊन आलो आहोत ज्या वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान तुम्ही दररोज घरीच फॉलो करून तुमचे वजन झपाट्याने कमी करू शकता. जर तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन करण्यासाठी  प्रवास सुरू करत असाल, तर तुमच्यासाठी येथे 4 छान गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचा प्रवास सोपा आणि परिणामकारक होऊ शकतो. पोषणतजेज्ज्ञ आंचल सोग्नी यांनी इंस्टाग्राम पेजवर अधिक माहिती दिली आहे. (Weight Lose Tips) त्या अनेकदा चाहत्यांसोबत डायट आणि फिटनेसशी संबंधित टिप्स शेअर करत असतात. (Healthy Weight Loss Tips from Women)

आपल्या आवडत्या व्यायामाने सुरूवात करा

तुम्हाला आवडणाऱ्या व्यायामापासून सुरुवात करा. यामध्ये नृत्य, जॉगिंग, स्किपिंग किंवा अगदी चालणे देखील असू शकते. शिक्षेसारखे वाटण्याऐवजी व्यायामाचा आनंद घ्या. तुम्ही नियमित झालात की तुमच्या ध्येयानुसार एक एक करून इतर व्यायाम सुरू करा.

आवडते पदार्थ खाणं सोडू नका

तुम्हाला तुमचे आवडते पदार्थ खाणे सोडावे लागणार नाही. फक्त ते कमी प्रमाणात खा. यामुळे तुम्हाला आवडते पदार्थ खाणं न सोडता वजन घटवता येऊ शकतं. 

सतत वजन चेक करू नका

तुमची प्रगती फक्त वजनाच्या प्रमाणात मोजू नका. तुमच्या शरीरात होत असलेले बदल पाहा. दररोज वजन तपासणे योग्य नाही, यामुळे तुमच्या मेंदूमध्ये वजनाचा ताण येतो. हार्मोन्स, आहार आणि व्यायाम यांचा शरीरावर परिणाम होतो, दररोज वजन वेगवेगळे असू शकते, त्यामुळे आठवड्यातून एकदा वजन तपासावे.

सुसंगता

ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची प्रगती होत नाही असे तुम्हाला वाटत असतानाही, नियमित व्यायाम करा आणि निरोगी खा. यामुळे नक्कीच शरीरात बदल दिसून येईल. हळूहळू व्यायामाचा वेळ आणि व्यायामाचे प्रकार वाढवा.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स