Lokmat Sakhi >Fitness > वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसतंय? ३ महिन्यात पोटावरची चरबी कमी होईल; या 4 सवयी लावा

वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसतंय? ३ महिन्यात पोटावरची चरबी कमी होईल; या 4 सवयी लावा

Weight loss in just 3 month change these habits : चांगल्या सवयी तुम्ही नियमित ३ महिने फॉलो केल्या तर स्टेप बाय स्टेप तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 11:35 AM2023-04-16T11:35:11+5:302023-04-16T12:32:05+5:30

Weight loss in just 3 month change these habits : चांगल्या सवयी तुम्ही नियमित ३ महिने फॉलो केल्या तर स्टेप बाय स्टेप तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

Weight loss in just 3 month change these habits to avoid obesity belly fat burning tips | वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसतंय? ३ महिन्यात पोटावरची चरबी कमी होईल; या 4 सवयी लावा

वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसतंय? ३ महिन्यात पोटावरची चरबी कमी होईल; या 4 सवयी लावा

वजन कमी करणं वाटतं तितकं सोपं नाही. तुम्ही किती दिवसात आणि किती किलो वजन वाढवलं आहे यावर तुमचा वजन कमी होण्याचा वेग अवलंबून  असतो. (Weight Loss Tips)  आजकाल प्रत्येकालाच स्लिम, ट्रिम आणि जिरो फिगर बॉडी असावी असावी असं वाटतं. लाख प्रयत्न करूनही पोट आणि कमरेवरची चरबी कमी होत नाही. अशा स्थितीत काही चांगल्या सवयी तुम्ही नियमित  ३ महिने फॉलो केल्या तर स्टेप बाय स्टेप तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. (Weight loss in just 3 month change these habits)

कॅलरीज कमी घ्या

भारतातील खाद्यपदार्थात तेलकट आणि गोड पदार्थ भरपूर आहेत, परंतु अशा गोष्टी आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नसतात आणि ते वजन वाढण्यास देखील कारणीभूत असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कमी कॅलरीयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही हे नियमितपणे केले नाही तर वजन कमी होण्याची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल.

व्यायाम नियमित करा

वजन कमी करण्यासाठी फक्त सकस पदार्थ खाणे पुरेसे नाही, यासाठी तुमचा थोडा वेळ व्यायामात घालवणे देखील आवश्यक आहे. शरीराच्या हालचाली जितक्या चांगल्या असतील तितकेच फिटनेस मिळवणे सोपे होईल. तुम्ही वर्कआउट्स अनेक प्रकारे करू शकता. यासाठी काहींना जिममध्ये तासनतास घाम गाळणे आवडते, तर काहींना पार्क किंवा रस्त्यावर धावणे. योगासने देखील इच्छित परिणाम मिळवून देऊ शकतात.

रोज चालण्याची सवय ठेवा

जर तुम्ही जड व्यायाम करू शकत नसाल तर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात दररोज 10,000 पावले चाला. याचा मागोवा घेण्यासाठी आता बाजारात अनेक स्मार्ट वॉच आली आहेत, जर हे शक्य नसेल तर मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही किती पावले चालली आहात हे जाणून घ्या. यामुळे तुमचे वजन तर कमी होईलच पण तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

रोज किती पाऊलं चालल्यानं वजन पटापट कमी होतं? सुडौल, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

साखरयुक्त पदार्थ खाऊ नका

चहा, कॉफी खीर, आईस्क्रीम, पेस्ट्री असे गोड पदार्थ खाल्ल्यानं नकळत साखरेचं प्रमाण वाढतं आणि वजन कमी होणं कठीण होतं. तर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करा. गोड पदार्थ खात असाल तर साखरेचा पर्याय शोधा किंवा कमीत कमी साखर असलेले पदार्थ खा. 
 

Web Title: Weight loss in just 3 month change these habits to avoid obesity belly fat burning tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.