Join us  

वजन 91 होते, आता 81 झाले; समीरा रेड्डी सांगतेय, 'वेटलॉस' हा छळ नाही कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 2:02 PM

Fitness tips: समीरा रेड्डीने १० किलो वजन कमी केलं आहे.. तिचा फिटनेस फॉर्म्युला (weight loss tips by Sameera Reddy) तिने नुकताच साेशल मिडियावर शेअर केला असून सगळीकडे तो चांगलाच व्हायरल झाला आहे..

ठळक मुद्देया पाेस्टमध्ये ती म्हणते की मी वजन घटवलं ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची नाही. तर..........

बाळंतपणानंतर वाढलेलं वजन हा अनेक महिलांपुढचा प्रश्न.. त्यामुळे अनेक जणी त्यावरचे उपाय शोधत असतात. सर्वसामान्य महिलांना छळणारा हा प्रश्न अभिनेत्रींना तर पार पछाडून सोडतो.. कारण त्यांच्यासाठी त्यांचं वाढतं वजन हा जबरदस्त चिंतेचा विषय असतो.. म्हणूनच तर करिना कपूर, शिल्पा शेट्टी यांच्यासारख्या इतरही काही अभिनेत्रींनी बाळंतपणानंतर वाढलेलं वजन (weight gain after delivery) कसं घटवलं, याविषयी माहिती घेण्यासाठी अनेक जणी उत्सूक असतात.. या अभिनेत्रींच्या यादीत येणारं आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री समीरा रेड्डी..

 

समीरानेही तिच्या बाळंतपणानंतर जबरदस्त वेटलॉस केला आहे. इतर अभिनेत्रींचा वेटलाॅस आणि समीराचा वेटलॉस यात मुख्य फरक असा की तिचा वेटलॉस करण्याचा प्रवास हा खूप रिॲलिस्टिक आणि प्रत्येकीला जमेल असा वाटतो... वेटलॉस करण्यासाठी तिने नेमकं काय केलं, याची माहिती तिने नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली असून तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.. या पोस्टमध्ये समीराने तिचे २ फोटो शेअर केले आहेत. एक फोटो यावर्षीचा लेटेस्ट आहे, तर दुसरा फोटो मागच्या वर्षीचा आहे. मागच्यावर्षी तिचं वजन तब्बल ९१ किलो होतं.. पण आता मात्र तिने ते १० किलोने घटवलं असून सध्या तिचं वजन ८१ आहे, असं ती सांगते आहे. 

 

या पाेस्टमध्ये ती म्हणते की मी वजन घटवलं ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची नाही. तर वजन कमी केल्यामुळे माझी एनर्जी आणि क्षमता वाढली ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी बाब आहे.. केवळ वजनाच्या काट्यावर लक्ष केंद्रित करून डाएट करण्यापेक्षा समीरासारखा विचार करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल..

जाड झालात म्हणून स्वत:च्याच शरीराची लाज वाटतेय? समीरा रेड्डी म्हणते....

वजन कमी करण्यासाठी समीराने या काही गोष्टी केल्या..Weight loss journey of actress Sameera Reddy- वजन कमी करण्यावरचा फोकस कधी जाऊ दिला नाही. गेला तरी लगेच पुन्हा मी माझ्या ध्येयावर फोकस करायचे.- intermittent fasting समीराला उपयोगी ठरलं... - नकारात्मक विचार येऊ नयेत, म्हणून तिने मानसिक दृष्ट्याही खूप मेहनत घेतली आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला.- खेळांमधून आनंद घेतला. त्यामुळे वेटलॉस करत असाल तर तुम्हीही एखादा खेळ खेळा, असं ती सांगते आहे.- दर आठवड्याचा वेटलॉस किती याचा ती नियमितपणे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून फॉलोअप घेत होती.- रिॲलिस्टिक गोल सेट करा.. उगाच झटपट वजन कमी करण्याच्या नादात जाऊ नका.- जाड असल्यामुळे स्वत:चा तिरस्कार कधीही केला नाही. वजनाचा ताण कधीही घेतला नाही. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्ससमीरा रेड्डी